पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांशी बोलता बोलता मोदींचा कंठ दाटून आला. करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते. याचवेळेस करोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. करोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं म्हणताच मोदींना रडू आलं. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भात भाजपा समर्थक आणि विरोधक दोघांकडूनही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. त्यातच आता मोदींच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ विरोधकांनी व्हायरल केला आहे. एका माजी केंद्रीय मंत्र्यानेही मोदींचा हा जुना व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केलाय.
नक्की पाहा >> Photos: भारतीय संसद ते अमेरिकेतील FB चा कार्यक्रम… सात वर्षांमध्ये मोदी कधी आणि कुठे कुठे भावूक झाले
नक्की वाचा >> “नेतृत्व दिशाहीन असेल तर संकट अधिक गडद होतं”, मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
काय आहे व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ २०१९ साली जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील सूरतमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा आहे. व्हिडीओमध्ये मोदी, “रडत राहणं हे काही लोकांच्या स्वभावामध्येच असतं. मात्र माझा न रडण्यावर विश्वास नाही आणि रडवण्यावरही नाही,” असं म्हणताना दिसत आहे.
नक्की पाहा >> Video: “काही दिवसांत मोदी TV वर येऊन रडतील”; खासदाराने १७ एप्रिलला केलेली भविष्यवाणी खरी ठरली
मोदींच्या या वाक्यानंतर उपस्थित समर्थकांनी आरडाओरड करुन त्यांच्या वक्तव्याला दाद दिल्याचंही दिसून येत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या अरुण यादव यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केलाय. “काल मग मगरीचे अश्रू डोक्यातून का आले?, याचं उत्तर देशातील जनतेला हवं आहे,” अशा कॅप्शनसहीत यादव यांनी या व्हिडीओ शेअर केलाय.
कुछ लोगों का स्वभाव होता है रोते रहना, न मेरा रोने में विश्वास है न रुलाने में – नरेंद्र मोदी</p>
कल फिर घड़ियाली आंसू क्यों बहाए ?
देश की जनता जानना चाहती है ।#ModiStopCrying_RepealLaws #CrocodileTears #CrocodileTearsModi@INCIndia @INCMP @RahulGandhi @OfficeOfKNath @digvijaya_28 pic.twitter.com/xzelj8BXmS— Arun Yadav (@MPArunYadav) May 22, 2021
याआधीही व्हायरल झालाय मोदींचा एका व्हिडीओ…
यापूर्वीही काही दिवसांआधी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींनी त्यावेळी केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसवर टीका केली होती. या व्हिडीओमध्ये मोदी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका करताना दिसत आहे.
नक्की वाचा >> सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर मोदींना मिळाला; राम गोपाल वर्मांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत
“संकटं येत राहतात. मात्र एखाद्या संकटाच्या वेळी नेतृत्व दिशाहीन, असहाय्य आणि निराश असेल तर ते संकट अधिक गडद होतं. सव्वाशे कोटी लोकांचा देश आज निराशेच्या गर्तेत अडकला आहे. दिल्लीतून देशावर राज्य करणाऱ्यांबद्दल आशा निर्माण होईल, विश्वास निर्माण होईल, हरवलेला विश्वास पुन्हा ठेवता येईल असा कोणाताही विचार अथवा कृती दिल्लीतील राज्यकर्त्यांकडून केली जात नाहीय. पुढील वाटचालीसाठीच्या उपाययोजनाही दिल्लीने केल्या नसल्याचं दिसून येत आहे. देशाचे दुर्देव आहे की देश चालवणाऱ्यांना देशाच्या संरक्षणाची चिंता नाहीय आणि देशाच्या घसरणाऱ्या चलनाचीही चिंता नाहीय,” असं मोदी या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.