पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वगळता एकाही नेत्याला नरेंद्र मोदींइतके फॉलोअर्स नाहीत. त्यामुळेच मोदी जेव्हा एखादी गोष्ट किंवा फोटो पोस्ट करतात तेव्हा त्याची चर्चा देशातच नाही तर जगभरामध्ये होते. सध्या असेच चित्र पहायला मिळत आहे मोदींनी अमेरिकेसाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडिया वनमधून पोस्ट केलेल्या एका फोटोची. विशेष म्हणजे मोदींनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर आता या फोटोवरुन त्यांची आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या गांधी कुटुंबियांच्या फोटोची तुलना होत असल्याचं चित्र दिसत आहे.
नक्की पाहा हे फोटो >> अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत; पाहा खास फोटो
झालं असं की बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान मोदी अमेरिकेसाठी दिल्लीमधून रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेला रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत, असं मोदी म्हणाले. मोदींनी विमानात बसल्यानंतर काम करतानाचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास मोदींनी शेअर केलेल्या या फोटोला सध्या १२ तासांच्या आतमध्ये १८ हजारांहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. “फार दिर्घकाळ विमानप्रवास म्हणजे कागदोपत्री काम आणि काही महत्वाच्या फाइल्स तपासण्याची संधी असते,” अशा कॅप्शनसहीत मोदींनी हा फोटो शेअर केलेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा