भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफनं कतरिना कैफसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. मोहम्मद कैफनं या फोटोसोबत मजेशीर कॅप्शन दिलं आहे. शेवटी ‘कैफ भेटले. माणुसकीशिवाय आतापर्यंत कोणतंही नातं नाही’ असे मजेशिर कॅप्शन त्यानं फोटोला दिलं आहे. कैफच्या या पोस्टनंतर नेटीझन्सनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.

कतरिना कैफ सध्या भारत चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी कतरिना आणि सलमान खान भेट देत आहेत. यावेळी दोघांनी मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण या दोन माजी भारतीय क्रिकेटपटूसोबत वेळ घालवला. सलमान खानने याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अली अब्बास दिग्दर्शित आणि सलमान खान आणि कतरिना कौफ अभिनित भारत चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. सलमान खान आणि कतरिना यांच्याशिवाय चित्रपटात तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ कलाकरांसह वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. दरम्यान, इरफान पठाण आणि मोहम्मद कैफ सध्या समालोचनचं काम करत आहेत.