Shocking video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्यातील दृश्यं चमत्कारयुक्त वाटली असतील. परंतु, कित्येकांचा चमत्कारादी बाबींवर विश्वास नसतो. तुमचाही चमत्कारावर विश्वास नसेल, तर हा व्हिडीओ पाहा. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कधी रेल्वेत, तर कधी विमानात बाळाचा जन्म झाल्याची काही प्रकरणं आहेत. असाच एका बाळाचा जन्म एका कारमध्ये झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ महामार्गावरील आहे, जिथे पती-पत्नी कारमधून फिरायला गेले होते. दोघेही एकमेकांशी बोलत आहेत आणि त्यांच्या मस्तीत मग्न आहेत. व्हिडीओमधील स्त्री गरोदर असून, तिने सीट बेल्टही बांधला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण, नंतर बायकोला पोटात हलके दुखू लागते आणि तिला प्रसूती वेदना होऊ लागतात. त्यावेळी ती क्षणाचाही विलंब न करता, पायजमा काढायला लागते आणि पुढच्या क्षणी जे घडते, ते पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील.

नेमकं काय घडलं?

झालं असं की, गर्भवती स्त्रीला चालत्या कारमध्ये वेदना होतात आणि त्यानंतर ती बाळाला जन्म देते. आश्चर्यकारक बाब म्हणजे बाळंतपणाच्या प्रक्रियेदरम्यान तिच्यासोबत फक्त एकच व्यक्ती हजर होती आणि ती म्हणजे तिचा नवरा, जो गाडी चालवत होता. एका स्त्रीमध्ये किती सहनशक्ती अन् किती आत्मशक्ती असते ते हा व्हिडीओ पाहून कळतेय. कारण- या महिलेने कोणाचीही मदत न घेता, चालत्या कारमध्ये स्वत:च बाळाला जन्म दिला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मूल आईच्या पोटातून बाहेर पडते आणि रडायला लागते.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/TaraBull808/status/1856061542049165651

हेही वाचा >> VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही

निसर्गाचा चमत्कार

@Naija_PR नावाच्या एक्स खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे; तर अनेकांनी व्हिडीओ पुन्हा पोस्टदेखील केला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले… जर स्त्री मजबूत असेल, तर ती काहीही करू शकते. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… निसर्गाचा चमत्कार, काय गोष्ट आहे. दुसऱ्या युजरने लिहिले… डॉक्टर आणि नर्सेसशिवाय हे कसे शक्य आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital shocking video goes viral on social media srk