Shocking video: गेल्या काही दिवसांमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तिंवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. अशातचं आता पिटबुलच्या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्‍याने एका चमुकल्यावर हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केलंय. मात्र पुढच्याच क्षणी आईनं जे केलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईची महानता कोणीही शब्दात व्यक्त करू शकत नाही. नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगातून आईचं प्रेम आणि वीरता व्यक्त होत असते. इतिहासातही आईने आपल्या मुलांसाठी केलेल्या कसरतीची अनेक उदाहरण सापडतात. अशाच एका आईनं रक्ताच्या थारोळ्यात पडून आपल्या मुलासाठी झुंज दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रशियाच्या येकातेरिनबर्ग येथील आहे. येथे एका Rottweiler जातीच्या कुत्र्याने अचानक आई आणि मुलावर हल्ला केला. आपल्या ५ वर्षाच्या चिमुरड्याला कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी एका आईने स्वतःच्या शरीराचा ढाल म्हणून वापर केला. या प्रयत्नात आईही जबर जखमी झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात भिजली पण ढालीसारखी मुलावर पडून राहिली. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही आई मुलाला झाकून कुत्र्यापासून त्याचा बचाव करताना दिसली.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/RT_com/status/1894828441494835702

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @RT_com नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

आपल्या देशातही भटक्या कुत्र्यांची दहशत

दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mom shields her 5yo kid with her own body to protect from rottweiler attack shocking video goes viral srk