Mom’s Genius Trick Teaches Curious Daughter a Lesson : लहान मुलांना साभांळणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेकदा पालक लेकरांच्या भल्यासाठी काही गोष्ट न करण्याची सुचना देतात पण एखादी गोष्ट करू नको म्हटलं की, लहान मुलांना तीच गोष्ट करायची असते. अनेकदा पालकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांवर ओरडावे लागत पण तरीही मुलं ऐकत नाही उलट जास्तच हट्टीपणा करतात. लहान मुलं अनेकदा हट्टीपणा करतात, पालकांचे ऐकत नाही अशा वेळी पालकांना कसे समजावावे हे कळतं नाही. पालकांना अनेकदा मुलांना वेगळ्या पद्धती वापरून समजावे लागते, कधी प्रेमाणे, तर कधी एखाद्या गोष्टीची भीती घालून समजवावे लागते. शाच प्रकारे आईने एका चेटकिणीची भीती लेकीला घातली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“कुठे पण जा, एकच प्रश्न…जेवलीस का?” मराठी तरुणाने हद्दच केली राव! थेट न्युयॉर्कमध्ये पोस्टर घेऊन फिरतोय, पाहा Viral Video

अनेकदा पालकांनी सांगितलेल्या गोष्टी मुलं ऐकत नाही, त्यापैकी एक म्हणजे लहान मुलांनी फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नये कारण त्यामुळे ते आजारी पडू शकतात. पण शेवटी लहान मुलंच ती.. कितीही सांगितले तर पुन्हा पुन्हा जाऊन फ्रिज उघडतात. असाच प्रकारे सारखा फ्रिज उघडणाऱ्या एका चिमुकलीला अद्दल घडवण्यासाठी एका आईने भन्नाट युक्ती लढवली आहे. लहान मुलांना अनेकदा पालक “भुती बाबा आला झोप लवकर”,”चेटकीण आली, पटकन जेवण कर” अशी भिती घालताना दिसतात. अशीच भिती घालून एका आईने लेकील्ली अद्दल घडवली आहे. या महिलेने चक्क चेटकिणीचे चित्र काढून फ्रिजमध्ये चिटकवले आहे, जेणे करून तिची लेक ते पाहून घाबरेल आणि पुन्हा फ्रिज उघडणार नाही. अगदी तसेच घडले, जेव्हा चिमुकली फ्रिज उघडते तेव्हा चेटकिणीचे चित्र पाहून ती घाबरते आणि पळून जाते. हे पाहून आईला हसू आवरत नाही.

इंस्टाग्रामवर mrs_aarti_rk’s आणि poojadnyan’s नावाच्या पेजवर शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “चिंची चेटकीण आली फ्रिजमध्ये”तसेच व्हिडिओवर दिसणाऱ्या आशयामध्ये लिहिले आहे की, “फ्रिज उघडणार नाही परत”

हेही वाचा –“Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे!”, हळद लागताच नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, Video Viral

व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांनी प्रचंड आवडला आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने सांगितले की,”एक दोन दिवस घाबरेल नंतर नाही”
दुसऱ्याने लिहिले की,” कल्पना चांगली आहे”
तिसऱ्याने लिहिले की, “खूप चुकीचं आहे. त्यापेक्षा चावी लावून ठेवा ना”
चौथ्याने लिहिले की, “हे बरं केलं”
पाचव्याने लिहिले की, “अस माझ्या मुलीबरोबर केलं तर ती परत परत उघडेल. तिला मज्जा येते अशी”
सहाव्याने लिहिले ,”माझा मुलगा फाडून कचर्‍याच्या डब्यात टाकेल. तो काही घाबरणार नाही”