सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ तर जीव की प्राण, असे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. अल्पावधीतच प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. आता एका मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. मांजर सोमवारी ऑफिसला जाताना कसा मूड असतो हे सांगते. या मांजरीची अवस्था पाहून तुम्हाला सोमवारी ऑफिसला जाताना कसं वाटतं? याची जाणीव होईल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मांजर पायऱ्यांवरून खाली येत आहे. पण पायऱ्या उतरण्याची शैलीच अशी आहे की, लोकांना त्याच्याबद्दल वाईट वाटतंय आणि हसूही येतंय. व्हिडीओमध्ये दिसणारी ही मांजर पायऱ्यांवरून खाली रेंगाळत येत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने ‘बोरिंग डे’ लिहून शेअर केला आहे. लोकांना ही पोस्ट आवडली असून त्यांनीही खूप कंटाळवाणा दिवस असल्याचं सांगितलं आहे.

वीकेंड आनंदात घालवल्यानंतर सोमवारी पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. इच्छा नसताना सोमवारी सकाळी अंथरुणातून उठून तयारी कशी करावी लागते? अशा कमेंट्स अनेकांनी दिल्या आहेत. एका यूजरने तर कमेंट करत विचारले की, या मांजरीला दुधात मिसळून काय दिले?. तर दुसऱ्या युजर्सने असं लिहिलं आहे, माझी अवस्थाही अशीच असते.

Story img Loader