Farming Video : अनावश्यक पैसे खर्च करण्याची सवय असेल, तर घरच्या मोठ्या व्यक्ती म्हणतात, “पैसा काय झाडाला येतोय का?” तुम्ही कधीतरी तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून हे वाक्य ऐकलंच असेल; पण झाडाला पैसे येणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला वाटेल की, हे कसं शक्य आहे? पण या व्हिडीओत जे दिसत आहे, ते अविश्वसनीय आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की, हे खरं आहे का?

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शेतात पैसे पेरताना दिसत आहे. त्यानंतर तो विविध पिकांच्या आत पैसे आल्याचं दाखवत आहे. डोळ्यांवर विश्वास न बसणारा हा व्हिडीओ आहे. पैशांचं पीक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शेतात पैसे पेरले तर खरंच पैशांचं पीक येतं का? तर अजिबात नाही. हा एक जुगाड म्हणजे संभ्रमित करणारा व्हिडीओ आहे.

हेही वाचा : “ये दोस्ती हम नही तोडेंगे …”; चप्पल घालण्यासाठी दोन मद्यपी मित्रांची तारेवरची कसरत; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

kattar_shetkari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक युजर्सनी टीका केली आहे. एका युजरने लिहिलेय, “काय फालतूगिरी सुरू आहे. काहीही रिल्स करतात” तर एका युजरने लिहिलेय, “फेमस होण्यासाठी काहीपण …” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खरं असतं, तर शेतकऱ्यांवर कधीही आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.”

Story img Loader