Shocking video: आजकाल पैसे म्हणजे खेळणं झालं आहे, पूर्वीसारखी पैशाची किंमत लोकांना राहिलेली नाही, लहान मुलांपासून अगदी प्राण्यांनाही आता पैसे कळतात. पैसा दिसला की भल्याभल्यांची नियत बदलते, हे आपल्याला माहितीच आहे. मात्र पैशासाठी फक्त माणूसत भुकेला नसतो तर प्राणीही असतात. याचच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल अजगर कशी शिकार करतो, कसं एखाद्याला गिळतो. मात्र कधी अजगराला पैसे चोरताना पाहिलंय का. नाही ना..मग हा व्हिडीओ पाहा. अजगराचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. मात्र याआधी आपण फक्त शिकारीच्या घटना पाहिल्या आहेत. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अजगरानं चक्क चोरी केली आहे. हो अजगरानं नोटांचं बंडल पळवलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भलामोठा अजगर नोटांचं बंडल घेऊन सरपटत पुढे पुढे जात आहे. पुढं दिसते की, अजगर हे नोटांचं बंडल घेऊन एका घरात शिरतो. घराबाहेर एक व्यक्तीही बसलेला दिसत आहे.

VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे, त्यामध्ये हा व्हिडीओ झिम्बाब्वेतील असल्याचं सांगितलं आहे. ज्या घरात हा अजगर प्रवेश करतो त्याला जीरा रेरेट्सो कपड्यांनी सजवलं जातं. हे कापड आफ्रिकन परंपरेनुसार शिकारी आणि पितृक पूजेशी संबंधित आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चहा प्रेमींनो हिंमत असेल तर ‘हा’ VIDEO पाहा; किळसवाणा प्रकार पाहून येईल संताप

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ lindaikejiblogofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.