Monk Climbs Up Mountain Without Safety Harness : आपण आतापर्यंत टिव्हीवर, सिनेमांमध्ये अंगावर भाले टोलून घेणारे, पाण्यावरून चालणारे, उकळत्या तेलात बसणारे, साधना करत असताना हवेत तरंगणारे डोक्यावर ड्रील मारून घेणारे असे वेगवेगळे चमत्कार करणारे बौद्ध भिक्खू पाहिले असतील. हे चमत्कार खरे असतील का? असं प्रश्न पडला असेल. असाच एक भिक्खूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओमध्ये एक भिक्खू हे सरळ चढाव असलेला डोंगर सरसर चढताना दिसून येत आहेत ते ही कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय…हे वाचून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एखादा चमत्कारच पाहतोय की काय असा भास हा व्हायरल व्हिडीओ पाहताना येतो.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तसा जुनाच आहे. पण तो सध्या नव्याने व्हायरल होऊ लागलाय. शारीरिक दृष्ट्या फिट असूनही आपण साधं डोंगर सर करायचा विचार जरी केला तरी अंगाचा थरकाप होतो. तर सरळ चढाव असलेला डोंगर सर करायची वेळ आली तर काय अवस्था होईल, याची कल्पना न केलेलीच बरी. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमधल्या भिक्खूंनी जे करून दाखवलंय ते पाहून तुम्ही विचारात पडला. या व्हिडीओमध्ये एक भिक्खू सरळ चढाव असलेला डोंगर कोणतेही सुरक्षा साधन न वापरता सरसर पार करताना दिसून येत आहेत. हा डोंगर चढण्यासाठी आलेल्या एका महिलेने हा व्हिडीओ शूट केलाय. व्हिडीओ शूट करणारी महिला सुरक्षा साधनांसह डोंगर पार करत असताना आपल्या बाजूने जाणारे एक भिक्खू काही सेकंदात डोंगर सर करतात, हे पाहून आश्चर्यचकित झाली.
आणखी वाचा : बापरे! HCL च्या सीईओचा पगार किती आहे माहितेय का? पॅकेजमध्ये आहेत इतके शून्य
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : निष्काळजीपणाचा कळस! विमानातल्या जेवणात सापाचं डोकं, पाहा VIRAL VIDEO
तनसू येगेन नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. व्हिडीओ पाहून हा चमत्कार आहे की काय, अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केलीय. इतका सरळ चढाव असलेला डोंगर हे भिक्खू कसे काय चढले, असा सवाल प्रत्येक जण विचारताना दिसत आहे. यात ते कुठेही डगमगले सुद्धा नाहीत. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय.