२२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू राम यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर सोहळ्याचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले. प्रभु राम यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त आतुर झाले होते. या भक्तिमय वातावरणात प्रभु राम यांचे प्रिय भक्त हनुमंत यांच्या दर्शनासाठीही अनेक लोक आवर्जून जात आहेत. दरम्यान बंजरगबली हनुमान यांच्या दर्शनासाठी आलेल्या एका वेगळ्या भक्ताची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक भक्त हनमुंताचे दर्शन घेण्यासाठी एका टॉवर चढल्याचा दावा केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभू श्री राम आणि बजरंगबली यांच्या भक्तीमध्ये केवळ मनुष्य नाही तर पशु-पक्षीही रमतात असे मानले जाते. प्रभूच्या चरणी डोक टेकवून आशीर्वाद घेण्यासाठी लोक सर्व अडथळे पार करतात. अशाच एका भक्ताच्या आगळ्यावेगळ्या भक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये बंजरंगबली हनुमंताचे चरणस्पर्श करण्यासाठी एक भक्त उंच टॉवरवर चढला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तुम्ही पाहिला का या भक्ताचा व्हिडीओ?

प्रभूच्या दर्शनसाठी टॉवरवर चढणारा भक्त

भक्त आणि देवाचा हा अप्रतिम व्हिडिओ एमी शर्मा नावाच्या इंस्टाग्राम हँडलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मंदिर दिसत आहे आणि त्याच्या समोर एक मोठा लाल टॉवर दिसत आहे. व्हिडीओ झूम करताच तुम्हाला या टॉवरवर भगवान बजरंगबलीची मूर्ती दिसेल आणि नीट पाहिल्यास त्या मुर्तीखाली एक माकडही बसलेले दिसेल. हे माकड नुसते हनुमंताच्या मुर्तीकडे टक लावून पाहत आहे. जणू त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहे.” व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की, हनुमंताच्या दर्शनासाठी हे माकड टॉवरवर चढले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये,”हे तुमच्या चरणी आहे, कृपा करा प्रभू, जय श्री राम, जय हनुमान” असे लिहिले आहे.

हेही वाचा – Viral Video : ढोल ताशाच्या तालावर नाचणाऱ्या जपानी नवरीचा मराठमोळा थाट! नऊवारी, दागिने अन् मुंडवळ्यासह केला साज शृंगार

भक्तांचे डोळे आले भरून

हा भक्तीमय व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेक भक्तांनी ‘जय श्री राम’ लिहून देवाची स्तुती केली आहे. हे दृश्य पाहून त्यांचे डोळे भरून आले. “माकडाची ही भक्ती युजर्सना इतकी आवडली होती की, त्याला आतापर्यंत ८ लाख ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा – भटक्या कुत्र्यांना महापालिकेने पकडले अन् बाईकस्वाराने केले मुक्त; चालत्या वाहनातून उड्या मारणाऱ्या कुत्र्यांचा Video Viral

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “हनुमंताचा चेहरा टक लावून पाहत आहे यावरून तो किती भक्ती करतो हे मला जाणवते.” दुसरा म्हणाला, “छोटे माकड पाहून मी भावूक झालो आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkey climbed tower to touch feet of hanumanji watch mysterious viral video snk