इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येणार नाही. सोशल मीडियावर माणासांचे माकडचाळे करतानाचे व्हिडीओ आपण नेहमी पाहतो. पण आता खुद्द माकडानेच माकडचाळे केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. दारू पिऊन नशेत टूल्ल व्हायला काही माणसांना आवडतं. मात्र, माणसांच्या व्यतिरिक्त आता प्राण्यांनाही दारू पिण्याचा मोह आवरत नाहीय. नुसती दारूच नाही तर या माकडाने चखण्यावरही ताव मारला. मध्यप्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील हा व्हायरल व्हिडीओ आहे. काही माणसं मैदानात दारु पिण्यासाठी बसली होती. पण माकड आल्यानंतर त्यांची नशाच उतरली आणि ते जागेवरून उठले. त्यानंतर या माकडाने चखण्यासोबत दारूचा पेग मारला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ शिवपुरी जिल्ह्यातील करौरा तहसील क्षेत्रातील आहे. त्याठिकाणी असलेल्या मैदानात दोन तरुण दारू पिण्यासाठी बसले होते. त्याचदरम्यान एका माकडाने त्यांच्या पार्टीत उडी घेतली. माकडाला प्रचंड भूख लागल्याने त्या तरुणांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माकडाला पाहून त्या मुलांनी तेथून पळ काढला. त्यानंतर माकडाने जे काही केलं, ते एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं. माकडाने दारुचा ग्लास हातात घेवून मोठ्या स्टाईलमध्ये पेग मारला आणि बाजूला असलेल्या चखण्यावरही ताव मारला.
इथे पाहा दारू पिण्याऱ्या माकडाचा व्हिडीओ
माकडाने ज्या तरुणांना मैदान सोडून पळायला भाग पाडलं होतं, त्यांनीच हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. माकडांच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत, असं येथील लोकांचं म्हणणं आहे. माकडांच्या दहशतीमुळं तेथील ग्रामस्थ वैतागले आहेत. कधी दुचाकीवरून जात असताना, तर कधी चालत असताना ही माकडं माणसांवर हल्ला करतात. त्यामुळे येथील लोकांना या माकडांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.