दोन प्राण्यांमधली मैत्री फार क्वचित पाहायला मिळते. त्यांना दररोज अन्न, निवारा अशा अनेक गोष्टींसाठी एकमेकांशी भांडत, स्पर्धा करत जगण्याचा संघर्ष करावा लागतो. तर काही वेळा दोन प्राणी आपल्याला अचंबित करत एकमेकांशी मैत्री करतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड चक्क हरणाच्या पाठीवर बसलेले आहे आणि हे दोघं फिरताना दिसत आहेत.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओ ‘आयआयटी मद्रास’च्या कॅम्पस मधला आहे. व्हिडीओमध्ये हरीण कॅम्पसमध्ये गवत शोधताना दिसत आहे. तर त्याच्यावर बसलेलं माकड आरामात या सफारीचा आनंद घेताना दिसत आहे. ‘हे हुशार माकड आयआयटी मद्रास येथील आहे’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. पाहा या हुशार माकडाची भन्नाट सफारी.

आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओवर अनेकांनी या हुशार माकडाच्या कल्पनेचे श्रेय आयआयटीला दिले आहे. यावर आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी कमेंट करत, ‘याचे श्रेय आयआयटीला देऊ नका. असे दृश्य वन्य प्राण्यांबाबत नेहमी पाहायला मिळते, कारण ते एकमेकांची मदत करतात. माकडांना अशी सफारी मिळते आणि हरणाला जर कोणी शिकार करणार असेल तर माकड त्याला त्याबाबत सावध करते.’

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या भन्नाट मैत्रीचे कौतुक केले आहे.

Story img Loader