Viral video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत एक धोकादायक साप आणि माकड एकाच झाडावर बसल्याचं दिसत आहे. खरं तर सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात पण या व्हिडीओत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.सापाच्या समोर कोणी आलं तर साप त्याला सोडणार नाही, हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच ते प्राण्यांनादेखील माहिती असतं. त्यामुळेच सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात. पण या व्हिडीओतील माकड मात्र तसं करत नाहीये. माकड हा मजेदार आणि तितकाच त्रासदायक प्राणी आहे. त्याची काही कृत्य पाहून लोकांना हसवतात, तर काही अंगावर शहारा आणतात. या माकडानेही चक्क किंग कोब्रासोबत पंगा घेतला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माकडानं साप फणा काढून उभा राहिलेल्या कोब्रा सापाच्या डोक्यावर जोरदार टपल्या मारल्या. त्यामुळे साप भडकला आणि दंश करण्याच्या इराद्यानं हल्ला करू लागला. पण माकडानं अगदी सहज त्याचा हल्ला परतवला. सोबत त्याला आणखी दोन-चार फटके लगावले. त्यामुळे शेवटी सापानंच हार मानली आणि तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला. शिवाय त्याला चावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापालाही तो दूर करण्याचा करत नाही, तर त्यासोबत मस्ती करत आहे. त्यामुळे विषारी साप दंश करण्याचा प्रयत्न करत असतानाही हे माकडं इतकं शांत कसं राहू शकतं? असा प्रश्न अनाकांना पडला आहे. शिवाय अनेकांनी हे माकड खूप धाडसी असल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: मैत्री कधी संपत नसते; फाळणीत दुरावलेले मित्र तब्बल ३५ वर्षांनंतर समोरासमोर, पाहा ‘तो’ भावनिक क्षण

माकडाचा आणि सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत जवळपास ४२ हजार लोकांनी लाईक केला आहे. तर अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “माकडाची शांतता पाहून वाटतं आहे की, कदाचित तो शेवटचं खाऊन घेत आहे.” तर आणखी एकाने लिहिलं “माकड खूप आळशी आहे.”