हल्ली प्रत्येकालाच स्वतःचे व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर शेअर करायला भरपूर आवडतं. स्वतःता व्हिडीओ पाहून लोक भरपूर आनंद घेत असतात. स्वतःचा एखादा व्हिडीओ पाहून आपसूक आपल्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल देखील येत असते. मात्र, फक्त माणसंच नाही तर प्राणीदेखील यात मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर काही माकडांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात माकड अगदी माणसाप्रमाणे मोबाईल हातात पकडत स्वतःचा व्हिडीओ पाहताना दिसून येत आहेत. खास बाब म्हणजे स्वतःला व्हिडीओमध्ये पाहून हे माकड चेहऱ्यावर अजब हावभावही देत आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सची भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
या मजेशीर व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं, की काही माकड हे घोळक्याने बसलेले आहेत. एक व्यक्ती त्याच्या हातात मोबाईल पकडत त्यांच्या जवळ येतो. मोबाईल पाहून हे माकड देखील जवळ येतात. अगदी माणसाप्रमाणेच हे माकड देखील मोबाईल हातात पडकण्याचा प्रयत्न करतात आणि मोबाईलमध्ये डोकावतात. त्यापाठोपाठ बाकी इतर माकड देखील मोबाईलमध्ये डोकावून पाहण्यासाठी जवळ येतात. मोबाईलमध्ये या माकडांनी स्वतःलाच पाहिल्यानंतर मात्र सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होतात. काही वेळानं सर्व माकड काही क्षणासाठी थांबतात आणि अशा पद्धतीनं बघत राहतात, जणू व्हिडीओमध्ये त्यांना दुसरे कुणी माकड दिसले आहेत. या भ्रमातच माकड मोबाईलच्या स्क्रीनवर हात लावून स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. पण जसं करतोय तसंच समोरचा माकड करतोय हे पाहून सर्व माकड आणखी चक्रावून जातात.
आणखी वाचा : व्हीलचेअरवर बसलेला दिव्यांग अचानक खाली पडला अन् चालायला लागला! पाहून तुम्ही थक्क व्हाल, पाहा VIRAL VIDEO
खरं तर या व्यक्तीने सर्व मकडांचा व्हिडीओ शूट करून तो माकडांना दाखवतो. मोबाईलमध्ये स्वतःलाच पाहून सर्व माकडांच्या चेहऱ्यावर अगदी मजेदार हावभाव पहायला मिळतात. इतकंच नव्हे तर यातील एक माकड तर मोबाईलमध्ये दुसरं माकड समजून त्याला किस सुद्धा करू लागतो. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह मात्र तुम्हाला आवरता येणार नाही.
helicopter_yatra_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला २ लाख ११ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला ७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे.
आणखी वाचा : ‘मेरा पिया घर आया’ म्हणत लग्नात नवरीने मैत्रिणीसोबत केली जबरदस्त एन्ट्री, धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
काही सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या माकडांच्या प्रेमात पडाल. काही माकडे व्हिडीओमध्ये गंभीर होताना दिसत आहेत, तर काही मजा घेत आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि तो खूप एन्जॉय करत आहे. इतकंच नाही तर अनेक लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि त्यावर चॅट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.