स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. जगभरातील सुमारे एक तृतीयांश तरुणांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. माणसांनंतर आता प्राण्यांनाही मोबाईलचं व्यसन लागलंय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकडे स्मार्टफोन वापरताना दिसत आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अगदी माणसांप्रमाणेच या व्हिडीओमधल्या माकडांना मोबाईल चालवताना पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एकूण चार माकडे दिसत आहेत. यातील तीन माकडे स्मार्टफोनमध्ये डोकावताना दिसत आहेत. एक व्यक्ती हातात मोबाईल पकडून या माकडांना दाखवताना दिसत आहे. मोबाईल पाहिल्यानंतर हे तीनही माकडे मोबाईलकडे एकटक पाहताना दिसत आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत असताना आजुबाजुचे माकडेही मोबाईलमध्ये डोकावताना दिसत आहे. हे पाहून ही माकडे स्मार्टफोनवरील स्क्रीन स्क्रोल करू लागतात. माणसांप्रमाणे ही माकडे स्मार्टफोनची स्क्रीन अप-डाऊन आणि राईट-लेफ्ट स्वॅप करताना दिसत आहेत. स्क्रीनला टच केल्यानंतर आणि स्वॅप केल्यानंतर दिसणारे चित्र पाहून ही माकडे आणखी उत्सुक होतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसून येत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : “लग्नानंतर दररोज साडी घालावी लागेल!” आसामच्या जोडप्याचा लग्नासाठी अनोखा करार
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भर पावसात नाग नागिणीचा प्रणय, दीड तास सुरु होता रोमान्स
हा व्हिडीओ क्वीन ऑफ हिमाचल नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. लोकांना हा व्हिडीओ फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ एक वर्षापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येतंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. “यांना तरी मोबाईलची सवय लावू देऊ नका” असं काही युजर्सनी म्हटलंय. तर या माकडांना सुद्धा मोबाईलवर काम करण्याची ट्रेनिंग देऊ शकतो, असं काही युजर्सनी म्हटलंय.