अनेकदा आपण आपल्या आसपास असे लोक पाहिले असतील जे नेहमी हातात मोबाईल काही ना काही बघण्यात व्यस्त असतात. अनेकांना तर मोबाईलचं व्यसनच लागलेलं असतं. मात्र, हीच सवय एखाद्या प्राण्याला लागली तर? सहाजिकच असं काही पाहायला मिळाल्यास आपण हैराण होऊ. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये एक माकड ऐटीत हातात मोबाईल घेऊन एक सिक्रेट मिशन आखत असल्याचं दिसत आहे. अगदी माणसाप्रमाणेच हे माकड मोबाईल हाताळताना दिसून येतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे माकड एका व्यक्तीच्या शेजारीच बसलेलं दिसून येतंय. या व्यक्तीसोबत हे माकड अशा गप्पा मारतोय जणू जो बऱ्याच वर्षापासून या व्यक्तीला ओळखत असावा. माकडाचा हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हिडीओमध्ये खुर्चीवर बसलेले एक माकड पुढे वाकून शेजारी बसलेल्या माणसाच्या खांद्यावर थोपटताना दिसत आहे. आपला फोन बघण्यात व्यस्त असलेला माणूस वर बघतो तर माकड त्याच्या कानावर काहीतरी बोलत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ इथेच संपत नाही, माकडाचे रहस्य ऐकून तो माणूसही मोबाईलकडे बघतो आणि मग माकडाला कानात काहीतरी सांगतो.

दोघांचे संभाषण बघून असे वाटते की हा माणूस आपल्या फोनमध्ये आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी काहीतरी शोधत आहे. त्याचवेळी माकड खूप खोलवर मंथन करताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी तो माणूस पुन्हा एकदा आपला मोबाईल माकडाच्या हातात देतो आणि तो आपला मुद्दा सिद्ध करत असताना दिसतो. माकड आणि माणूस यांच्यातील हे जबरदस्त संवाद सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वडिलांचा व्यवसाय ठप्प पडला, मग मुलाने एक शक्कल लढवली, आज ग्राहकांची गर्दीच गर्दी असते

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिला अगदी सजून धजून गाडीत बसल्या, पण मग पुढे जे काही घडलं, पाहून हादरून जाल

नेटिझन्स म्हणाले, “प्रेम आणि विश्वासाचे एक अद्भुत दृश्य”
आयपीएस रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माकड आणि मानव यांच्यातील जबरदस्त संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या मस्त आणि मजेदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले, ‘गर्लफ्रेंडसोबत सेट अप करत आहे’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘प्लॅनिंग उघड झाले.’ दुसरीकडे, एका ट्विटर युजरने कमेंट बॉक्सवर लिहिले, ‘प्रेम आणि विश्वासाचे अद्भुत दृश्य.’