Monkey Viral Video : उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये माकडांची दहशत काही थांबण्याचे नाव घेत नाही. मथुरा, अयोध्या, वाराणसीसह अनेक शहरांमध्ये माकडांची संख्या खूप जास्त आहे, अनेकदा इथे माकडांविरोधात
मोहीम राबविली जाते. मात्र, तरीही माकडांना आळा घालता येत नाही. माकडांमुळे पर्यटकांचेच नव्हे त्यांच्या सामानाचेही मोठे नुकसान होते. सोशल मीडियावर माकडाचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक माकड छतावरून थेट एका अलिशान कारवर पडले. कारचे सनरुफ तोडून ते आत शिरेल, मात्र त्यानंतर माकडाने असे काही केले जे पाहून सर्वच अवाक् झाले.
माकड कारवर पडल्यानंतर सनरूफ तुटून कारच्या आत गेले अन्…
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माकड कारवर पडल्यानंतर सनरूफ तुटून ते कारच्या आत गेले. व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटते की, माकडाला दुखापत झाली असावी, आता तो उठू शकेल की नाही याची शक्यता नव्हती. मात्र, काही वेळाने माकड तुटलेल्या सनरूफमधून एखाद्या हिरोप्रमाणे उडी मारत बाहेर पडल्याचे दिसले. माकडाला अशा प्रकारे बाहेर येताना पाहून व्हिडीओ पाहणाऱ्यांना धक्काच बसला.
माकड कारच्या आत पडल्यानंतर ते बाहेर निघेल असा कोणालाच अंदाज नव्हता, पण दुसऱ्याच क्षणी माकड उठले आणि तिथून पळून गेले.
या माकडाने वाराणसीतील एक हॉटेल मालक मुकेश जयस्वाल यांच्या हॉटेलच्या गच्चीवरून त्यांच्या कारवर उडी मारली आणि ते थेट कारच्या आत पडले. यामुळे कार मालकाला फटका बसला असून, कारचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
एका युजरने लिहिले आहे की, “भारतात सनरूफ कारला काही अर्थ नाही.” दुसऱ्याने लिहिले आहे की, “कारच्या आत काहीही सापडले नाही म्हणून माकड लगेच बाहेर आले.” तिसऱ्याने लिहिले आहे की, “माझ्या गाडीवर सनरूफ नाही, माकडाने उडी मारली आणि पाच-सहा काचेच्या काचा फोडल्या तर मी काय करू?” शेवटी एकाने लिहिलेय की, ‘सनरूफ सुरक्षित नाही, ही कोणत्या कंपनीची कार आहे.”