मानवी वस्तीत माकडांच्या नासधुशीची अनेक प्रकरणे तुम्ही वाचली असावीत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन माकडे चक्क ऑडी कारची नासधूस करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोन माकडे ऑडी कारसोबत छेडछाडी करीत आहे. ही माकडे ऑडीकारच्या मागील बाजूची नेमप्लेट ओढताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये या दोन माकडांपैकी एक माकड ग्लास क्लीनसुद्धा तोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कुणालाही संताप येईल.

हेही वाचा : सेन्ट्रल जेल की रेस्टॉरंट? पोलीस घेतात ऑर्डर तर कैदी वाढतात जेवण, वाचा काय आहे प्रकरण

@the_viralvideos या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ जूना असल्याचे बोलले जात आहे; मात्र पुन्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : Optical Illusion : फोटोमधील कोणता आकडा आहे गायब? वाटतं तितकं सोपं नाही, एकदा क्लिक करून पाहाच

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, हा व्हिडीओ यूकेमधील आहे. या व्हिडीओवर एक युजर लिहितो, “अशी अफवा आहे की हे माकड स्वत:ची कार तयार करण्यासाठी कारचे पार्ट्स मिळवायचा प्रयत्न करीत आहे, ज्यामुळे त्या कारमध्ये त्यांना पळून जाण्याचा प्लॅन करता येईल.”

Story img Loader