Monkey Viral Video : माणसांप्रमाणे माकडांची बुद्धीही दिवसेंदिवस तल्लख होत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. एकीकडे देशात इंटरनेटचा वापर घरोघरी होत असतानाच आता मोबाईलवर खेळण्याचे माकडांनाही वेध लागले आहेत. मोबाईल हातात घेतल्याशिवाय माणसांची सकाळ होत नाही असं म्हणतात. ते सत्यच आहे. तर दुसरीकडे आता जंगलातील माकडंही मोबाईलमध्ये क्विल करण्यासाठी रांगा लावत असल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. मोबाईल ऑपरेट करण्यासाठी झाडावर बसलेली माकडं थेट जमिनीवर उतरली आणि त्या मोबाईलवर क्लिक करायला लागली. हा जबरदस्त व्हिडीओ केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
माकडांचा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले, “देश डिजिटल युगात…”
एका माणसाच्या हातात मोबाईल दिसल्यावर झाडावरची माकडं खाली उतरून मोबाईल स्क्रोल करण्यात व्यस्त झाली असल्याचं या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मोबाईल खेळण्यासाठी माकडांनी एकप्रकारे रांगच लावल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. माकडांचा हा भन्नाट व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत मंत्री किरण रिजिजू यांनी कॅप्शन देत म्हटलं, “खरंच देश डिजिटल युगात प्रवेश करताना दिसत आहे. आता प्राणीही माणसांप्रमाणे मोबाईल वापरताना दिसत आहेत.”
नक्की वाचा – Viral Video: नवऱ्यासाठी कायपण! ट्रॅफिक जॅम झाल्यावर सजलेली कार सोडून नवरी निघाली….
इथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जवळपास १३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओला प्रतिक्रिया देताना म्हटलं, ‘हा तर प्राण्यांवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “देशात मोबाईलची मागणी लवकरच वाढणार आहे.” माकडांचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून हजारो नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत माकडांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्नही करत आहेत.