Viral Video: उन्हाळ्याच्या झळा जशा माणसांसाठी तापदायक ठरतात, तशाच त्या प्राण्यांसाठीही त्रासदायक असतात. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात प्राण्यांची देखभाल करणे, त्यांना हायड्रेट ठेवणे आणि त्यांना वेळोवेळी खायला देणेही गरजेचे असते. प्राण्यांना डिहायड्रेशनची समस्या होऊ नये म्हणून त्यांना दिवसभरात थंड आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावे. प्राणी तापलेल्या जमिनीवर बसले नाहीत ना हेसुद्धा पाहणे तितकेच गरजेचे असते. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रखरखत्या उन्हामुळे एक माकड झाडावरून पडले; पण माणुसकी दाखवून, तेथील आजूबाजूचे रहिवासी मदतीसाठी वेळीच धावून आल्याने त्या माकडाचा जीव वाचला.

ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील आहे. रखरखत्या उन्हामुळे एक माकड झाडावरून पडले. परिसरातील नागरिकांना ही गोष्ट समजताच ते माकडाच्या मदतीसाठी धावून आले. परिसरातील सगळ्यांनी मिळून माकडाला अंघोळ घातली, त्याला तेलाने मालिश केले आणि ओआरएस (ORS) चे पाणी एका मगमधून त्याला प्यायला दिले. उन्हाळा त्या माकडासाठी त्रासदायक ठरला. पण, परिसरातील रहिवाशांनी पुढे येऊन त्याला वेळीच मदत केली. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…‘शेजार धर्म’ आला कामाला; आजारी व्यक्तीसं ९४ वर्षीय आजोबा घेऊन गेले सूप अन्… ; पाहा हृदयस्पर्शी VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, माकड रस्त्यावर पडून आहे आणि नागरिकांची सर्वत्र गर्दी दिसते आहे. सर्व नागरिक मिळून त्याला अंघोळ घालताना दिसत आहेत. तसेच काही जण थंड तेलाने मालिश करून त्याला हायड्रेट ठेवण्यासही मदत करताना दिसत आहेत; नागरिकांनी केलेल्या या सर्व गोष्टींमुळे माकडाला पुन्हा जीवदान मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @SachinGuptaUP या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने कमेंट केली आहे, “उन्हाळ्यात प्राण्यांची स्थिती खूप वाईट असते आणि फार कमी लोक त्याकडे लक्ष देतात… पण, हे पाहून बरे वाटले.” तर, अनेक जण ”या उन्हाळ्यात स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या”, असेसुद्धा आव्हान करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच उष्माघातामुळे एक माकडाचे पिल्लू झाडावरून पडले आणि बेशुद्ध झाले होते. तेव्हा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील छतरी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या ५१ वर्षीय हवालदार विकास तोमर यांनी त्याला मदत केली. त्यांनी डिहायड्रेशनमुळे झाडावरून पडलेल्या माकडाच्या त्या बाळाला सीपीआर दिला. आज पुन्हा एकदा डिहायड्रेशनमुळे एक माकड झाडावरून खाली पडले आणि नागरिक वेळीच मदतीसाठी धावून आले.

Story img Loader