सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ. एखादा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला तर बघता बघता व्हायरल होतो. काही व्हिडिओ नेटकऱ्यांना हसायला भाग पाडतात, तर व्हिडिओतून शिकण्यासारखं बरंच काही असतं. प्राण्यांच्या विचित्र हालचाली आणि हावभावांना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. प्राण्यांचं माणसाप्रमाणे वागणं नेटकऱ्यांना भावतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओ @naturelovers_ok नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मजेदार व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. यामध्ये एक माकड डोंगराळ भागात असलेल्या रस्त्याच्या कडेवरून वेगाने धावताना दिसत आहे. दोन पायांवर धावणाऱ्या माकडाचा हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. माणसांप्रमाणे धावत असल्याने या माकडाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. लाइक्ससोबत हसण्याचे इमोजी देखील पोस्ट केले जात आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

माकडाच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, हा तर सुपरमॅन आहे. तर दुसऱ्या युजर्सने वेगवान धावपटू उसेन बोल्टशी तुलना करत लिहिलं आहे की, हा उसेल बोल्टला नक्कीच हरवेल.