सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधित कंटेंट इंटरनेटवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कंटेंटपैकी एक आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपला फोन, लॅपटॉपची मेमरी त्यांच्याच फोटो आणि व्हिडीओने भरलेली असते. अशाच एका माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. ज्यात माकड स्वतःला आरशात पाहून वेडेवाकडे हावभाव करतो आणि त्याचा खूप आनंद घेतो. सुरूवातीला तर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहून हा माकड दचकतो. त्यानंतर तो ज्या करामती करतो हे पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही, हे मात्र नक्की.

काय आहे व्हिडिओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही स्वत: पाहाल, एका बाईकवर हे माकड बसलेले आहे. त्याचवेळी बाईकवर असलेल्या आरशाकडे जेव्हा त्याची नजर जाते त्यावेळी आरशात त्याला स्वत:चा चेहरा दिसतो. आपला स्वत:चा चेहरा आरश्यामध्ये पाहून तो घाबरतो आणि लगेच तो मागे होतो. मात्र, माकड पुन्हा एकदा त्या आरशात आपला चेहरा पाहतो. आणि निट पाहण्याचा प्रयत्न करतो. तो स्वत:ला दात दाखवतो, तोंड वाकडं करुन दाखवतो आणि मग पुन्हा घाबरतो. माणसाप्रमाणे तो आरशात पाहून कधी हसतोय तर कधी डोक्यावर हात फिरवतोय तर कधी स्वत:कडे आश्चर्याने बघत राहतोय. माकडाचे हे वेडेवाकडे हावभाव बघायला खूप मजेशीर आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे आणि या माकडाचीही स्तुती करत आहेत. आरशात आपलीच प्रतिमा आहे हे त्याला कळत नाही. सोशल मीडियावर या माकडाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना तर हसू आवरता येत नाही. या माकडावर अनेक मजेदार कमेंट्स करत हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

@KlatuBaradaNiko नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तसा गेल्या वर्षीचा आहे. परंतू पुन्हा एकदा हा व्हिडीओ नेटिझन्ससमोर आलाय. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले असून माकडाने दिलेले हावभाव पाहून नेटिझन्स सुद्धा या व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

Story img Loader