सोशल मीडियावर सतत कोणत्या कोणत्या गोष्टीची चर्चा होत असते. गेल्या काही तासांपासून एसटी बस सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांपूर्वी एसटीबस चालकाचा व्हिडिओ चर्चेत आला होता ज्याने नव्या एसटी बसची रचना विचित्र आहे की बसमध्ये चढताच येत नाही. सोशल मीडियावर या व्हिडिओ चर्चेत असताना एसटी बसचा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एक माकड एसटी बसचा प्रवास करताना दिसत आहे. माकड चक्क एसटी बसच्या छतावर बसून बस प्रवास करताना दिसत आहे जे पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर sonali17093 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ धाराशिवमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. थेट बसच्या छतावर बसून माकडाने बस प्रवासाचा आनंद घेतला आहे. चक्क वीस किलोमीटरपर्यंत माकडाने बसच्या छतावर बसून प्रवास केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बसची पाटीवर कळंब लातूर कळंब असे लिहिलेले दिसत आहे. ही लातुर रस्त्यावरील गाधवड गावात आली तेव्हा हे माकड बसच्या छतावर जाऊन बसले. बस सुरू झाल्यानंतर माकड खाली काही उतरलेच नाही.

हेही वाचा – Video: “पुण्यात खेळला जाणार का Squid Game?”, पुणे स्टेशनवर Ddakji खेळताना दिसल्या दोन व्यक्ती? वाचा, पुणेकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया

हेही वाचा – तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने मजेत म्हटले की, ड्रायव्हर नवीन आहे म्हणून त्याला रस्ता दाखवत आहेत”

दुसऱ्याने म्हटले, एसटीवर बसलाय खरं पण तिकिट काढलयं का?

तिसऱ्याने लिहिले की, “गाडीत जागा नव्हती, म्हणून वरती बसावं लागले वाटते”

चौथ्याने म्हटले की, “अर्ध्या तिकिट घेत होते म्हणून फुल्ल तिकीट काढून एसीमध्ये प्रवास सुरु आहे.”

पाचव्याने लिहिले, “भाऊ या वेळेस पैसे नाहीये, वरती बसून येतो, साईड द्या रे”

सहाव्याने लिहिले की, “वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन.