आयआयटी मुंबईचे विद्यार्थी तसेही अभ्यास आणि अभ्यासाच्या ओझ्याने त्रस्तच असतात पण आता या विद्यार्थ्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. अभ्यासाने या मुलांची झोप उडवण्यापेक्षा आता माकडांनी यांची झोप उडवली आहे. कारण माकडांनी आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये  उच्छाद मांडला आहे आणि याच माकडांचा धसका  विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
कॅम्पस परिसारात अनेक माकडे राहतात. याचा वावर आत कॅम्पसपरिसरात असायचा तोपर्यंत ठिक होते पण हिच माकडे आता चो-या देखील करू लागली आहेत. या कॅम्पस  परिसरात अनेक हॉस्टेल आहेत. त्यामुळे मुलांमध्ये  माकडामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. ही माकडे घरात घुसून त्यांच्या वस्तू चोरुन नेतात अशी तक्रार या मुलांकडून केली जात आहे. इतकेच नाही तर रुम लॉक असताना देखील ही माकडे अगदी सहजतेने रुम उघडून घरात शिरतात. या मुलांच्या इतर वस्तूंची देखील या माकडांनी नासाडी केली असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. कच-याच्या डब्यातून कचरा फेकून देणे, बेड वर झोपणे असे प्रकार देखील माकडांनी केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
माकडांनी घातलेल्या गोंधळामुळे आपले रुम खराब होत असल्याची चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या माकडांवर वेळीच लगाम घालण्याची मागणी या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. माकडांमुळे आपल्या कपड्यांचे आणि वस्तूचे खूपच नुकसान होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. पण या कँपस परिसरात माकडांचा वावर एका ठराविक काळात असल्याचे येथल्या एका प्राध्यपकांनी सांगितले, माकड माकडचाळ्यांसाठीच प्रसिद्ध आहेत जंगल शेजारी असल्यामुळे त्यांना लगाम घालणे अशक्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनीच काळजी घेण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा