तुम्ही कधी माकडाला पोहताना पाहिले आहे का? ते सुद्धा माणसांप्रमाणे.. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर आता बघा. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहिला जात आहे, ज्यात एक माकड अगदी माणसासारखा स्विमिंग करताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडतो.
माकडांच्या अनेक सवयी माणसांसारख्याच असतात. मात्र, माकडांमध्ये माणसांपेक्षा जास्त चपळता असते. सोशल मीडियावर अनेकदा माकडांच्या उड्या मारण्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर माकडाचा स्विमिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड इतकं अप्रतिम पोहताना दिसतंय, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल “वाह…क्या बात है!’ या व्हिडीओला सोशल मीडियावरही खूप पसंती दिली जात आहे.
आणखी वाचा : पोपटासोबत व्हिडीओ बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIRAL VIDEO
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माकड पाण्याच्या तलावात उडी मारून दुसऱ्या बाजूला कसे जाते हे तुम्ही पाहू शकता. त्याचा सोबतचा आणखी एक दुसरं माकड तिथं उभं राहून त्याला पाहत असतो. माकड इतक्या अप्रतिम पद्धतीने पोहताना दिसलं की ते पाहून कोणीही त्याचा चाहता होईल. माकडांच्या उड्या व्यतिरिक्त पोहतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे.
आणखी वाचा : OMG! मच्छिमाराला सापडला १०० वर्ष जुना महाकाय मासा, VIRAL VIDEO पाहून सारेच जण थक्क
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : या गोंडस चिमुकलीने केला अप्रतिम डान्स, VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल
हा व्हिडीओ monkeyloversworld ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यासोबतच इतर अनेक ग्रुप्स आणि पेजेसनीही हा बंद पोहण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याला खूप पसंतीही मिळत आहे. हा व्हिडीओ मोठ्या संख्येने लोकांनी पाहिला असून अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या इन्स्टाग्राम लिंकवर क्लिक करून पाहू शकता.