उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामधील तिंदवारी पोलीस स्थानकामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील छापर गावामध्ये माकडांची दहशत मागील बऱ्याच काळापासून आहे. मागील दोन महिन्यांपासून माकडांनी या गावामध्ये उच्छाद मांडला आहे. अशाच एका घटनेमध्ये माकडाने घराच्या अंगणात झोपलेल्या एका दोन महिन्याच्या बाळाला उचून पळ काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माकड या बाळाला घेऊन जात असल्याचं दिसताच घरातील सदस्यांनी आरडाओरड केला. यानंतर माकडाने घराच्या छप्परावरुन बाळाला खाली फेकलं. या घटनेमध्ये बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी वनविभागाच्या लोकांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाळण्यात झोपलेल्या दोन महिन्याच्या बाळाला उचलून नेलं आणि छप्परावरुन फेकून दिलं. यामध्ये या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टमशिवाय बाळाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मजूर म्हणून काम करणाऱ्या विश्वेश्वर वर्मा यांच्या दोन महिन्याच्या अभिषेक नावाच्या बाळाला छप्परावरुन फेकून दिलं. या बाळाची आई माया घरामध्ये इतर कामात व्यस्थ होती. त्याचवेळी तीन ते चार माकडांनी घरातील अंगणामध्ये प्रवेश केला. त्यापैकी एक माकड बाळाला उचलून छप्परावर घेऊन गेलं.

घरातील लोकांच्या आणि गावकऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी माकडाने तिथून पळ काढताना बाळाला खाली फेकलं. थेट छप्परावरुन बाळ जमीनीवर पडल्याने या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तिंदवारी ब्लॉकमधील छापर गावात दोन महिन्यांपूर्वी ६५ वर्षीय आजी छप्परावर उच्छाद मांडणाऱ्या माकडांना हाकलत असतानाही अशीच एक दुर्घटना घडली होती. यावेळी माकडांनी तेजनिया यांच्यावर माकडांनी हल्ला केला होता. यावेळी ही महिला छप्परावरुन पडून गंभीर जखमी झाली होती. या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेले मात्र वाटतेच त्याचा मृत्यू झाला. याआधी सहा महिन्यांपूर्वी पिपरगावामध्येही माकडांनी सहा गावकऱ्यांना जखमी केलं होतं. नुकत्याच घडलेल्या या बाळाच्या मृत्यू प्रकरणाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना छापर गावाला भेट देण्याचे निर्देश दिलेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkey takes away two month old baby throws from roof baby died scsg