पाणी वाचवणाऱ्या माकडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या १४ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये माकडाने मोठा संदेश दिला आहे. वाया जाणारं पाणी थांबवण्याचा प्रयत्न माकड करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
माणूसही प्राण्यांप्रमाणे का विचार करू शकत नाही? असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत. निहारिका सिंग पांजले या खात्यावरून टि्वटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यासाठी झक्कास असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. ‘जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना जर एवढी बुद्धीमत्ता, संवेदनशीलता असेल तर मग मला असा प्रश्न पडतो की, मानव असं का वागतो? आणि खरे प्राणी कोण आहेत? असा प्रश्न तिने टि्वटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ‘
If other beings of the #wild can have such #grace, #intelligence and #sensitivity …then I really don’t know what went wrong with us #humans ..#whoaretherealanimals ?@AdityaPanda @ParveenKaswan pic.twitter.com/cSzFtZm4FY
— Niharika Singh Panjeta (@Niharika_nsp) October 10, 2019
सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. पाणी वाचवण्याचा हा संदेश हनुमानानेच आपल्याला दिला आहे, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दिली.