Monkey Viral Video : माणसं आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना मिठी मारतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, केवळ माणसंच अशा भावना व्यक्त करतात असे नाही, तर कधी कधी प्राणी देखील आपल्या भावना उघडपणे व्यक्त करताना दिसतात. अनेकदा हे प्राणी माणसांबरोबर खोडकरपणा करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. या व्हिडीओत एक माकड अचानक एका शाळेतील वर्गात शिरले आणि चक्क एका विद्यार्थीनीला मिठी मारताना दिसले. यानंतर ते विद्यार्थीबरोबर असे काही करताना दिसले की, पाहून वर्गात उपस्थित विद्यार्थी जोरजोरात हसू लागले.

माकड उडी मारून दुसऱ्या बाकावर पोहोचले अन्…

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे महाराजा छत्रसाल बुंदेलखंड कॉलेजमध्ये एक वर्ग सुरू होता, यावेळी एक माकड अचानक त्या वर्गात घुसले. अचानक वर्गात माकडाला पाहून विद्यार्थी चांगलेच घाबरले. हे माकड एका बाकावरून उडी मारून दुसऱ्या बाकावर पोहोचले आणि विद्यार्थ्यांसह खेळू लागले. याचदरम्यान ते एका विद्यार्थिनीजवळ गेले आणि तिला जाऊन थेट मिठी मारली. यावेळी माकडाने तिचे केस पकडले आणि काहीवेळ तिच्या अंगावर खेळत बसले.

माकडाचा खट्याळपणा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड एका विद्यार्थिनीला मिठी मारताना दिसत आहे, यावेळी माकडाने तिचे केसही पकडले. बराच वेळ तिच्याशी खेळला आणि नंतर उडी मारुन दुसऱ्या बेंचवर पोहोचला. तिथे बसून त्याने एका विद्यार्थ्याचा बाकावर ठेवलेला पेन फोडला, इतकेच नाहीत वही देखील फाडली. मात्र, या संपूर्ण घटनेत माकडाने कुणालाही इजा केली नाही. माकड एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर उड्या मारत असल्याचे पाहून अनेक विद्यार्थी घाबरून वर्गाबाहेर पळाले. यावेळी काही विद्यार्थ्यांनीही माकडाचा खट्याळपणा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – मुंबईतील ‘या’ भागातील घराचे महिन्याचे भाडे ऐकून तुम्हालाही फुटेल घाम! टॉयलेट सीटच्यावर बसवलीय वॉशिंग मशीन अन्…; पाहा PHOTO

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स युजरने आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे.जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘एक सुंदर मिठी तुमचा खराब मूड लगेच चांगला करू शकते.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘प्राण्यांनाही प्रेमाची भाषा कळते.’