दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका माकडाचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. विमानतळ सूत्रांनी याची पुष्टी केली की हा व्हिडीओ आयजीआय विमानतळाचा आहे. त्यांनी हेही सांगितले की माकडाची सुटका करण्यात आली आणि कोणालाही इजा झाली नाही.व्हिडीओमध्ये, माकड डॉमॅस्टिक विमानतळाच्या प्रीमियम प्लाझा लाऊंजच्या बार काउंटरवर फळांचा रस पिताना दिसत आहे. प्रवासी त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात. फूड कोर्टमध्ये पुढे हे माकड काय करेल हे बघण्यासाठी थांबलेले दिसतात तर काही बघून लगेच निघून जातात.

डॉमॅस्टिक विमानतळावर ही घटना घडल्याचे सूत्रांनी दुजोरा दिला असताना, घटनेची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने अद्याप या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

एका प्रवाशाच्या वक्तव्यानुसार, दिल्ली ते मुंबई प्रवास करत असताना, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूरग्रस्त भागाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली. अल्पावधीतच मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते.

Story img Loader