Viral video: सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी अनेक व्हिडीओ प्राण्यांचे असतात. आता जंगलातील प्राणीदेखील मानवी वस्तीत वावर करताना दिसून येतात. काही जंगली प्राण्यांमुळे मानवी वस्तीत आता भीतीचं वातावरण पहायला मिळतं. फिरता फिरता प्राणी कधी हल्ला करतील याचा काही नेम नाही. काही प्राणी अधिक भयानक असतात, एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर ते त्यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी धावतात. माकडाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, यामध्ये माकडाने जंगलात आलेल्या कुटुंबाला सळो की पळो करुन सोडलं आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः धडकीच भरेल.

माकड हा प्राणी प्रेक्षणीय स्थळांवर सर्रास दिसतो. कारण पर्यटकांकडे खाण्याचे पदार्थ असतात. अन् हे पदार्थ मिळवण्यासाठी माकडं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. समोर आलेला हा माकडांच्या हल्ल्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या एका कुटुंबावर जंगलातील माकडाने हल्ला केला आहे. हे एकूण ४ जण आहेत आणि २ माकडं दिसत आहेत. ही दोन्ही माकडं या कुटुंबातील व्यक्तींवर हल्ला करत आहेत आणि त्यांच्या हातातील सामान हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी हे सगळेच स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. माकड हा अत्यंत खोडकर प्रवृत्तीचा प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यानं या सगळ्यांना अक्षरश: हतबल करुन ठेवलं आहे. बरेच जण माकड चाळ्यापुढे अक्षरशः गुडघे टेकतात, काहीजण प्रयत्नांमध्ये हार मानून माकडापुढे हात जोडतात. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली

हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकजण व्हिडीओची मजा घेत मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स खूप हसत आहेत. एका यूजरने म्हटले, ‘आम्ही मुले आहोत सर. आमच्या बाबतीत असेच घडते.