चंद्र प्रकाशात उजळलेल्या केदारनाथ मंदिराच्या मनमोहक फोटोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. बर्फाच्छादित हिमालयाच्या शिखरामध्ये वसलेले हे मंदिर निरभ्र आकाशात चांदण्यांच्या हलक्या निळसर प्रकाशात चमकत आहे. हे नेत्रदीपक दृश्य सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
एक्सवर @UttarakhandGo नावाच्या खात्यावरून हा सुंदर फोटो शेअर केला आहे. “केदारनाथ मंदिराचे रात्रीचे दृश्य पाहा” असे कॅप्शन देऊन हा फोटो शेअर केला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनां देखील हा फोटो प्रचंड आवडला आहे. आपल्या अधिकृत एक्स खात्यावर हा फोटो शेअर करत त्यांना या फोटोचे कौतुक केले आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, “रविवारी आरामखुर्चीवर बसून प्रवासाचा आनंद घेण्यापासून मी कसा दूर राहणार. हे आज मला आवडलेल्या पोस्टमध्ये सर्वात वरच्या स्थानी आहे…सौंदर्य…आणि शांतता.”
या फोटोची ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात आहे. अनेकांनी केदारनाथ धामचे स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. अनेक लोक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिंद्राच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा – महिला मंडळाचा नाद नाही करायचा!”, वाळवणाची राखण करण्यासाठी काकूंनी ठेवला वाघ, Viral फोटो पाहून पोट धरून हसाल
एका वापरकर्त्याने शेअर केले, “ऑक्टोबरमध्ये येथे आले होते, गौरीकुंड ते केदारनाथ ९ तासांत ट्रेकिंग केले आहे, केवळ अविश्वसनीय अनुभव! ट्रेकिंगसह अध्यात्मिक प्रवास,दोन्ही गोष्टी एकत्र पूर्ण केल्या !ही एक दैवी अनुभूती आहे! मंदिर,पार्श्वभूमी बर्फाच्छादित पर्वत, तुम्हाला फक्त ते अनुभवायचे आहे.”
एका X वापरकर्त्याने रात्रीच्या आकाशाखाली केदारनाथचे आणखी एक छायाचित्र शेअर केले आणि लिहिले,”हे दृश्य पाहा, मला असे वाटत आहे की मागे त्या पर्वतांमध्ये महादेवची आणि पार्वतीची विराजमान आहेत.”
तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ऑक्टोबरमध्ये मी माझ्या मित्रांसोबत तिथे गेलो होतो. खरोखर, केदारनाथ धामची ऊर्जा अतुलनीय आहे.
केदारनाथ मंदिर, हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. भगवान शिवाला समर्पित १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ते पूजनीय आहे आणि चार धाम तीर्थक्षेत्राचा एक प्रमुख भाग आहे.