जग बदलतंय. गेल्या दशकभरात शहरांचा किती झपाट्याने विकास होत आहे. गगनचुंबी इमारती, अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त अशी वाहतूक व्यवस्था आणि बरंच काही. शहर सुधारतयं, विकासाचा वेग वाढतोय पण या सगळ्यात मात्र शहरातली माणुसकी कुठच्या कुठे हरवून गेली आहे. हाँग काँगचंही असं काहीसं होत आहे. हाँग काँगचा विकास झाला असला तरी इथलं जगणं महागलं आहे. जगातील सगळ्यात महागड्या घरांच्या किंमती असलेल्या यादीत हाँग काँगचा क्रमांक येतो. येथे घर घेणे परवडण्यासारखे नाही. २०१२ पासून घरांच्या किंमतीत जवळपास ५० टक्क्याने वाढ झाली आहे. अशा ठिकाणी बिचारी गरीब सामान्य माणसं कशी राहत असतील याची कल्पना केलीत कधी?
मग हे नक्कीच पाहा. हा फोटो झगमगत्या हाँग काँगचा खरा चेहरा समोर आणले. झिव्हा वाँग सारखे अनेक लोक दीड चौरस फुटांच्या घरात राहत आहे. एका रिपोर्टनुसार सध्याच्या घडीला येथे दोन लाखांहून अधिक लोक १.८ चौरस फुटांच्या घरात राहत आहे. याला घर म्हणावं, खुराडं की पिंजरा हेच अनेकांना कळनेसा झालंय. येथल्या घरांचे भाव हे गगनाला भिडले आहेत त्यामुळे सामान्य माणसं घर विकत घेऊ शकत नाहीत. म्हणूनच ६१ वर्षीय झिव्हा वाँग असो की त्यांच्यासारखे अनेक लोक असो छोट्याश्या घरात आलेला दिवस ढकलत आहेत. इथली ही भीषण परिस्थिती आहे. त्याहूनही भीषण म्हणजे वाँग आणि त्यांच्यासारखे अनेक नागरिक या १.८ चौरस फुटांच्या घरासाठी दरमहा २० हजारांचे भाडे भरतात. गगनचुंबी इमरतीसाठी हे प्रसिद्ध असलं तरी इथे राहणा-या सामान्य माणसांची परिस्थिती मात्र विदारकच आहे.
वाचा : अशिक्षित असूनही ‘या’ गावातील तरुणांना येतात चार विदेशी भाषा