Former IAS Officer’s First Job In Mumbai Goes Viral: कोणत्याही पहिल्या कामाशी संबंधित अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात. पहिल्या नोकरीच्या बाबतीतही असेच काहीसे घडते. काही जणांचे काही अनुभव कटू असतात, तर काही लोकांचे चांगले असतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप मेहनत करून, चढ-उतार पार करत आपल्या ध्येयाकडे पोहचलेला असतो. यावेळी आपल्या वाटेला आलेला संघर्ष पाहून आपण निराश होतो किंवा नशिबाला दोष देतो. मात्र, काही काळानंतर हाच संघर्षाचा काळ किती सोनेरी काळ होता हे आपल्या लक्षात येतं. हेच जुने दिवस आपल्याला चांगले वाटतात, कारण त्या दिवसांमुळेच आज आपण इथपर्यंत आलेलो असतो. अशाच एका माजी आयएएस अधिकाऱ्याला आपले जुने संघर्षाचे दिवस आठवले आणि त्यांनी त्यांची जुनी आठवण सोशल मीडियावर शेअर केली.

पहिली नोकरी आणि पहिल्या नोकरीचा अनुभव हा फारच वेगळा आणि आठवणीत राहणारा असतो. पहिल्या नोकरीत पगार कमी असतो, मात्र हेच दिवस नंतर आठवतात आणि सहज आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते. माजी आयएएस अधिकाऱ्यानंही त्यांच्या पहिल्या नोकरीचा अनुभव शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यापूर्वी भारत सरकारचे सचिव म्हणून काम केलेले रोहित कुमार सिंग यांनी अलीकडेच एक नॉस्टॅल्जिक पोस्ट केली आहे. त्यात १९८० च्या दशकातील त्यांच्या नियुक्तीपत्राचा फोटो शेअर केला आहे, जेव्हा त्यांना TCS मुंबई येथे नोकरीची ऑफर देण्यात आली होती.

४० वर्षांपूर्वीच्या पहिल्या नोकरीचा अनुभव

आयएएस अधिकारी रोहित कुमार सिंग हे राजस्थान केडरच्या १९८९ च्या बॅचचे होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात TCS च्या मुंबई कार्यालयात प्रशिक्षणार्थी पदापासून झाली. त्यावेळची एक आठवण त्यांनी आता ४० वर्षांनी शेअर केली आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, “चाळीस वर्षांपूर्वी, IIT BHU मधील कॅम्पस भरतीद्वारे मला TCS मुंबई येथे पहिली नोकरी मिळाली. १३०० रुपयांच्या पगारासह, नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून दिसणारे समुद्राचे दृश्य खरोखरच भारी होते.”

पाहा पोस्ट

हेही वाचा >> “बायकोचा राग आला तर…” तरुणानं पुणेरी पाटीवर लिहला उपाय; रस्त्यावर सगळेच पुरुष थांबू लागले, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

या पोस्टने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याला आतापर्यंत २,५४,३०० व्ह्यूज आणि शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं म्हंटलंय “पहिल्या नोकरीत पगार कमी असतो पण अनुभव मोठा असतो” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “पहिल्या नोकरीची गोष्टच वेगळी”