एका इसमाने इतक्या सायकल चोरल्या की त्याच्या घराच्या मागील बाग त्या चोरलेल्या सायकलमुळे भरून गेली. पोलीस बरीच काळापासून या चोराला शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गुगलच्या मदतीने पोलिसांना या चोराला पकडण्यात यश आले आहे. गुगल अर्थमध्ये पोलिसांना त्याच्या घराची संपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांना गुगल अर्थच्या माध्यमातून घराच्या मागील अंगणात पार्क केलेल्या अनेक सायकली दिसल्या. युके, ऑक्सफर्डमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या घरातून पोलिसांनी ५०० हून अधिक सायकली जप्त केल्या आहेत.
जेव्हा पोलिसांनी या ५४ वर्षीय व्यक्तीला अटक केली तेव्हा त्याचे संपूर्ण अंगण सायकलींनी भरलेले पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. टेम्स व्हॅली पोलिसांनी निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. या व्यक्तीविरोधात यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र कसून चौकशी केली असता सर्व काही समोर आले.
पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
त्या व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, त्याच्या घरात अनेक सायकली उभ्या होत्या. त्याचे संपूर्ण अंगण सायकलींनी भरलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते या माणसाच्या घराच्या मागे उभ्या केलेल्या अशा सायकली पाहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी या माणसाच्या कृत्याविरोधात तक्रार करण्यास सुरुवात केली.
त्यांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी ते या व्यक्तीशी सायकलींबद्दल बोलायचे तेव्हा तो म्हणत असे की या सायकली मी आफ्रिकेतील गरजू मुलांसाठी गोळा करत आहे आणि लवकरच त्या तिथे पाठवणार आहे. शेजारी म्हणाले की, ही व्यक्ती कधी दिवसा तर कधी रात्री व्हॅनमध्ये या सायकली आणत असे. सध्या पोलीस या सायकली ज्यांच्या आहेत त्यांचा शोध घेत असून त्यांना त्यांच्या सायकली लवकरच परत केल्या जातील.
ऐकावं ते नवलच! वृद्धेला ३९ वर्षानं लहान तरुणावर झालं प्रेम; सोबत राहण्यासाठी केलं असं काही…
टेम्स पोलीस प्रवक्त्याने सांगितले: “इतक्या सायकली चोरीच केल्या जाऊ शकतात. आता या सायकली जप्त करण्यात आल्या असून,सध्या सायकलच्या मालकांचा शोध घेतला जात आहे.”