महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रविवारी जळगावमध्ये पार पडली. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. मात्र मोदींच्या या पहिल्याच सभेला अनेकांनी विरोध केल्याचे इंटरनेटवर पहायला मिळाले. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता. महाराष्ट्रात पूर आला असताना मोदी आले नाही आणि आता मते मागायला आले आहेत, तसेच शेतकरी आत्महत्या झाल्यावर पंतप्रधान महाराष्ट्र दौरा करत नाहीत केवळ मते मागायला येतात अशा अशयाचे अनेक ट्विटस हा हॅशटॅग वापरुन करण्यात आले होते. ‘राईट टॅग डॉट कॉम’ या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार या हॅशटॅग वापरुन एक लाखाहून अधिक ट्विटस एका दिवसात करण्यात आले. एकूण चार हजारहून अधिक जणांनाही हा हॅशटॅग आपल्या ट्विटमध्ये वापरल्याचे या वेबसाईटवरील डेटा सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा