Madhya Pradesh Viral Video: मोबाइलवर रील बनविण्याचा नाद अनेकांच्या जीवाशी येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईची सनदी लेखापाल तरूणी अन्वी कामदार हीचा रायगडच्या कुंभे धबधब्याजवळ ३०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. रील बनविण्यासाठी अन्वी दरीच्या टोकावर गेली आणि तिचा तोल जाऊन ती दरीत कोसळली होती. संपूर्ण भारतातून रोजच अशा घटना आता समोर येत आहे. मध्यप्रदेशच्या मुरेना येथून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. मुरेनातील अंबाह गावातील लहान मुले खेळता खेळता रील बनवत होते. रील बनविण्यासाठी एका ११ वर्षांच्या मुलाने गळफास घेण्याचा अभिनय केला, मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट येऊन त्याचा काही सेकंदात मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. अतिशय धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून लोक हळहळ व्यक्त करत आहेत.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

हे वाचा >> रील्ससाठी कॅमेरा हवा म्हणून कामवाल्या बाईने केली दागिन्यांची चोरी

व्हिडीओमध्ये काय दिसले?

मुरेना जिल्ह्यातील अंबाह गावात काही मुले खेळत होती. खेळता खेळता त्यातील एक मुलगा झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत उभा राहिलेला दिसतो. इतर मुले ओरडत पळताना दिसत आहे. तर एक मुलगा हे सर्व मोबाइलमध्ये चित्रित करत आहे. मध्येच गळ्यात दोरी घेतलेला मुलगा तडफड करायला लागतो. इतर मुलांना काही समजण्याच्या आतच त्या मलाचा मृत्यू होतो. अवघ्या काही सेकंदाचा सदर मुलाच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण बनला.

या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. ज्या मुलाने गळफास घेण्याचा अभिनय केला होता, तो झाडाच्या खाली असलेल्या कठड्यावर उभा होता. मात्र त्याचा तोल गेल्यामुळे तो कठड्यावरून खाली पडला आणि झाडाला बांधलेली दोरीने त्याचा गळा आवळला गेला. तो तडफडत असताना लहान मुलांना तो अभिनय करत असल्याचे वाटले. त्यामुळे सुरुवातीला तेही याचा आनंद घेतात. मात्र थोड्या वेळातच मुलांचा दोरी सोडा, दोरी सोडा असा आवाज व्हिडीओत येताना दिसत आहे.

हे ही वाचा >> Video: लहानशा मुलानं आगीला हलक्यात घेऊन केली ही चूक; जीवघेण्या संकटामुळे आयुष्यभराची अद्दल, पाहा नेमकं काय घडलं

मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्याबरोबर खेळणाऱ्या मुलांनी घाबरून तिथून पळ काढला. एवढेच नाही तर व्हिडीओ काढणाऱ्या मुलानेही मोबाइल त्याच ठिकाणी टाकून पळ काढला. जेव्हा या मुलाच्या कुटुंबीयांना ही घटना समजली, तेव्हा त्यांनी तातडीने मुलाला सोडवून रुग्णालयात नेले, मात्र तिथे मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चित्रीकरण करण्यासाठी वापरलेला मोबाइल ताब्यात घेतला आहे.