सोशल मीडियावर व्हायरल झालेला बक-यांचा हा फोटो तुम्ही कधीना कधी पाहिला असेलच. आतापर्यंत झाडांवर पक्ष्यांचा थवा बसलेला पाहिला असेल, पण प्रत्येक फांद्यावर उभ्या असलेल्या या बक-या पाहून तुम्ही म्हणाल नक्कीच हा फोटो म्हणजे फोटोशॉपचा नमुना असेल, आपल्या इथल्या बक-या नाही बुवा एवढ्या उंच झाडावर चढलेल्या कधी पाहिल्यात. ते खरंही आहे म्हणा.. हा फोटो आपल्या इथला नाही, तर तो मोरोक्को मधला आहे,  इथे आढळणा-या आर्गनची पिकलेली रसरशीत फळे खाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून बक-या उंचच उंच झाडावर चढतात.

वाचा : हे नियम ब्रिटनची राणीसुध्दा मोडू शकत नाही!

मोरोक्कोच्या नैऋत्येला आर्गनची झाडे आढतात, फक्त बक-यांसाठीच नाही तर माणसांसाठीही  फळ फायद्याची आहेत. या फळापासून जगातले सगळ्यात महागडे तेल बनते, आता हे तेल कसे बनते ते ऐकून तुम्ही कदाचित नाक मुरडाल, पण हे वाचणेही मजेशीर आहे. बक-या ही फळे खातात तेव्हा त्यांच्या बियाही गिळतात, या बिया विष्ठेवाटे बाहेर पडतात. त्यानंतर बक-यांची विष्ठा गोळा करून त्यातून बिया बाहेर काढल्या जातात, या बिया हाताने कुटून त्यापासून तेल काढलं जाते, म्हणूनच जगातील महागड्या तेलापैकी ते एक तेल आहे.

आर्गन फळे
आर्गनची फळे

तेलाचं जाऊ द्या, पण जागातली सगळ्यात महागडी कॉफी देखील अशीच बनवली जाते, आपल्या इथल्या कुर्गच्या मळ्यात मांजरीच्या प्रजातीचा एक प्राणी आढळतो, हा फक्त कॉफीची तिच फळ खातो जी पूर्णपणे पिकलेली असतात. या मांजरीच्या विष्ठेतली कॉफीच्या बिया गोळ्या करून त्यापासून कॉफी बनवली जाते.

आर्गनच्या बियांपासून तेल बनवले जाते
आर्गनच्या बियांपासून तेल बनवले जाते

 

Story img Loader