आफ्रिकन देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्कोमध्ये मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात शेकडो घरे कोसळली असून आतापर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विनाशकारी भूकंपाने देशात हाहाकार उडाला आहे.मोरोक्को देशात सर्वात शक्तिशाली विनाशकारी भूकंपाने हाहाकार माजवला आहे. तिथले बरेच व्हिडीओ सध्या व्हायरल होत असन असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो एका ढिगाऱ्याखाली दबला आहे.या चिमुकल्याचा बचावासाठी संघर्ष पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक चिमुकला दबला आहे. या चिमुकल्याचं फक्त डोक वर आहे बाकी संपूर्ण शरीर हे ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. या मुलाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
ढिगारा उपसताच मृतदेह निघतात
आफ्रिकेतील अत्यंत महत्त्वाच देश असलेल्या मोरोक्कोत शुक्रवारी रात्री भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ एवढी मोजल्या गेली. हा महाभीषण भूकंप होता. भूकंपात अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेले नागरिक झोपेतच गाडले गेले. या भूकंपात आतापर्यंत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी ढिगारा उपसला जातोय तिथे मृतदेह सापडत आहेत. मृतदेह सापडत नाही अशी एकही जागा नाही. अख्खा दिवस गेला, रात्र सरली तरी मृतदेह निघायचं थांबत नाहीये. मृत्यूचं असं तांडव कधीही कुणी पाहिलं नव्हतं, इतकं भयानक दृश्य सध्या मोरोक्कोत झालं आहे. एखाद्या भीतीदायक भागासारखा मोरोक्कोतील प्रत्येक भाग दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा>> VIDEO: लोकांची धावपळ आणि किंकाळ्या! मोरोक्कोतील भूकंपादरम्यानची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य CCTV मध्ये कैद
मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.