लावणी ही महाराष्टातील लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. सोशल मीडियावर एकापेक्षा एक लावणी नृत्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये फक्त मुली आणि महिलाच नव्हे तर पुरुष आणि तरुण मुलेही लावणी नृत्य सादर करताना दिसतात. सध्या अशाच एका गुरु शिष्याच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला आणि लहान मुलगी लावणीवर नृत्य करताना दिसत आहे. ही मुलगी गुरु आणि शिष्य आहे असे व्हिडीओमध्ये सांगितले आहे. गुरु- शिष्याच्या या जोडीने सुंदर लावणी नृत्य सादर केले आहे. दोघींची ठसकेबाज लावणी पाहून नेटकरी फिदा झाले आहे. “मी मोसंबी मी नारंगी” या जुन्या मराठी चित्रपटाती गीतावर दोघींनी लावणी सादर केली आहे. लोकांना या जोडीचे लावणी नृत्य फार आवडले आहे. मोसंबी नारंगी या चित्रपटातील गीत ‘मी मोसंबी मी नारंगी” एकेकाळी खूप गाजले होते. अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केले होते.

हेही वाचा – याला म्हणतात खरा कलाकार! गोठवणाऱ्या बर्फात वाजवतोय तबला; तरुणाचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! महिलेने झोमॅटोवरून मागवलेल्या चिकन न्युडल्समध्ये सापडलं मेलेलं झुरळ; कंपनीने म्हणे,” ऐकून फार वाईट वाटले…

व्हायरल व्हिडीओमध्ये sonalipawar_official नावाच्या अकांऊटवर इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मावशी-भाची जोडी कशी वाटली ते सांगा. गुरु -शिष्य जोडी” दोघींची जुगलबंदी पाहायला प्रेक्षकांना आवडत आहे. वयाने लहान असलेली मुलगीही तिच्या गुरुप्रमाणेच सुंदर लावणी सादर करत आहे. दोघींच्या अदा पाहून लोक फिदा झाले आहे. अनेकांनी कमेंट करत दोघींचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की, “मस्त” दुसऱ्याने लिहिले, “खरचं खूप छान जोडी आहे.” तिसऱ्याने लिहिले, “एकच नंबर, नृत्य छान होते.” चौथ्याने लिहिले, भन्नाट आहे जोडी,”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mosambi naringi beautiful lavani performed by teacher and student duo watch viral video once snk