भारतात बहुतांश लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. जलद आणि सुखकर प्रवासासाठी ट्रेनच्या प्रवासाला महत्त्व दिले जाते. यात ट्रेनने लांब पल्ल्याचा प्रवास अगदी आरामात करता येतो. यामुळे भारतातील बहुतांश भागात आता ट्रेनचे जाळे पसरलेले पाहायला मिळते. विशेष म्हणजे भारतातील अति दुर्गम भागातही तुम्हाला रेल्वेचे जाळे दिसले. पण ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना वारंवार दारात उभे राहून प्रवास करु नका असा सल्ला दिला जातो. तसेच चालत्या ट्रेनमध्ये चढू अथवा उतरु नये अशा सुचनाही केल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का, ट्रेनमध्ये अशी एक जागा आहे जी दरवाजापेक्षाही धोकादायक ठरु शकते. ही जागा कोणती आहे याबाबतचा व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे.
ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करण्यास मनाई केली जाते कारण चुकून पाय घसरला तर खाली पडून मृत्यू होऊ शकतो, पण ट्रेनच्या आत एक अशी जागा आहे जी दरवाज्यापेक्षाही जास्त प्राणघातक आहे. ट्रेनमधील या प्राणघातक जागेबद्दल लोकांना जागरुक करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तसेच लोकांना या ठिकाणी उभे न राहण्याच्याही सुचना करण्यात आल्या आहेत.
लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये एक जागा असते तिथे दोन बोगी एकत्र जोडल्या जातात. याठिकाणी कधीही उभे राहू नये, या जागेच्या खाली एक कपलिंग असते, सहसा हे कपलिंग उघडत नाही, पण जर चुकून हे कपलिंग उघडले तर तुम्ही सरळ खाली पडू शकता.
अनेकदा ट्रेनमध्ये खूप गर्दी असते तेव्हा लोक गुरांप्रमाणे ट्रेनच्या आत शिरतात. यावेळी बहुतेक प्रवासी ट्रेनच्या कपलिंगवरही उभे राहतात. पण कपलिंग सैल झाल्यानंतर ट्रेनची बोगी कशी वेगळी होते हे दाखवणारा व्हिडिओ त्या व्यक्तीने शेअर केला आहे.
जर कपलिंग उघडले तर तुम्ही सरळ खाली पडाल आणि ट्रेनच्या चाकाखाली याल. अशावेळी तुमची जगण्याची शक्यता फार कमी असते. यामुळे जेव्हाही तुम्ही ट्रेनमध्ये चढता तेव्हा या कपलिंगपासून दूर रहा.