‘पाणी हे खूप मौल्यवान आहे’, ‘जल हे जीवन आहे आणि जल हे अमृत आहे’ अशा शब्दांत पाण्याचे महत्त्व सांगितले जाते. खरंच पाणी हे खूप मौल्यवान आहे, जिथे वर्षांनुवर्षे पाऊसच पडत नाही अशा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा एक एक थेंब मोत्यासारखा आणि सोन्याहूनही मौल्यवान आहे. पण जगात काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी ‘मौल्यवान’ हा शब्द जरा जास्तच गंभीरतेने घेतला आहे. म्हणजे या कंपन्या सोन्याच्या किंमतीने पाणी विकतात बरं का! काय आश्चर्य वाटले ना? हो पण हे खरं आहे. जगातल्या अशा काही पाणी विक्रेत्या कंपन्या किंवा ब्रँड आहेत जिथे पाण्याचा एक थेंबसुद्धा खूप मौल्यवान आहे. इतका की या कंपन्यां ज्या किमतीत पाणी विकतात ते ऐकून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या तोंडचं पाणी पळेल.

* अॅक्वा दि ख्रिस्टालो ट्रिब्युटो ए मॉडीगिलानी या ब्रँडचे पाणी आहे जगातले सगळ्यात महागडे पाणी. आता नाव वाचूनच आपली बोबडी वळली असले पण त्याची किंमत ऐकाल तर तर तहान कुठच्या कुठे पळून जाईल. तर या ब्रँडचे ७५० मिलीलिटर पाण्यासाठी जवळपास तीन लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागते. आता तुम्ही म्हणाल एवढे जास्त पैसे मोजावे लागतातय म्हणजे पाणी काय सोन्याचं आहे का? पण हे काही अंशी खरंही आहे. या पाण्याची बाटली २४ कॅरेट सोने वापरून बनवली जाते. वरून या पाण्यात ५ मिलीग्रॅम सोन्याची पावडरही असते म्हणे. आता असं पाणी रोज रोज प्यायचं म्हटलं तर आपल्यावर तर कर्जाचा मोठा डोंगरच उभा राहिल नाही का!

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
170 countries conference held in busan on issue of eliminating plastic pollution
जगात किती प्लास्टिक कचरा जमा होतो? कोणत्या प्रकारचे प्लास्टिक सर्वाधिक आढळते? प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न जगभर विफल का?

modigilani
* कोन नीग्री ही मुळची जपानची कंपनी. हे पाणी प्यायल्यानंतर लठ्ठपणाचा त्रास होत नाही वरून तणावमुक्ती मिळते ती वेगळीच. वजनही आटोक्यात राहतं आणि त्वचाही तजेलदार राहते असा दावा या कंपनीचा आहे. अर्थात जपानी लोक तब्येत आणि दिसणं या दोन्ही गोष्टीबाबात अधिक सजग असतात. तेव्हा जपानी लोकांनी या कंपनीचे पाणी विकत घेतले तर आश्चर्य वाटायला नको. ७५० मिलीलिटर पाण्याच्या बाटलीची किंमत आहे जवळपास २६ हजार रुपये.

kona-nigari-water_042117103537
* ब्लिंग h2o हा आणखी एक महागडा पाण्याचा ब्रँड. विशेष म्हणजे हॉलीवूडच्या सेटवर अभिनेत्री आणि अभिनेत्यांसाठी या कंपनीच्या वॉटर बॉटल्सना जास्त मागणी आहे म्हणे. शॅम्पेनच्या बॉटलीसारखी ही पाण्याची बाटली दिसते आणि ७५० लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत ही २६०० रुपयांच्या आसपास आहे.

e273f58380d6706eb3b25a4c118257a5-670
*फिलिको हा सुद्धा एक प्रसिद्ध जपानी पाणी विक्रेता ब्रँड आहे. आकर्षक पॅकेजिंग हे याचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे च्या झाकणावर छोटासा मुकूट चढवण्यात आला आहे. तेव्हा या आकर्षक पाण्याच्या बाटलीमधून थेंबभर का होईना पण पाणी प्यावेसे कोणाला नाही वाटणार. पण आपली हि इच्छा देखील पूर्ण होऊ शकत नाही कारण या ७५० मिलीलिटर पाण्यासाठी जवळपास १४ हजारांचा खिशाला चटका बसणार हे नक्की. सध्या उन्हाळा आहे तेव्हा सोशल मीडियावर याची जास्तच चर्चा आहेत. सोशल मीडियावर ही माहिती व्हायरल होत आहे याची अधिकृत खातरजमा करण्यात आलेली नाही. या पाण्याची अव्वाच्या सव्वा किंमत ऐकून नेटिझन्सच्या घशाला कोरडच पडली नाही तर नवलंच, पण असो या पाण्यात सोने असू दे की चांदी आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं म्हणा. आपल्यासाठी माठातलं गारेगार घोटभर पाणीच एकदम बेस्ट. नाही का!

filico

Story img Loader