सोशल मीडियाचे जग सर्वात मजेदार आहे. इथे कधी काय पहायला किंवा ऐकायला मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी असे व्हिडीओ बघायला मिळतात जे तुम्हाला खूप भावूक करतात तर कधी काही व्हिडीओ पाहून आपल्याला हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडीओ काही मित्रांनी केलेल्या पार्टीचा आहे. एका ठिकाणी मित्रांसोबत जेवण करत असताना डायनिंग टेबलवर त्याच्या आवडीचे भरपूर पदार्थ मांडलेले दिसून येत आहे. हे सारे आवडीचे पदार्थ पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल. पण समोर टेबलरवर आवडीचे पदार्थ ठेवून सुद्धा या व्यक्तीला त्याच्या एका चुकीमुळे खाता आले नाहीत. यावेळी जे घडतं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांना पाहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण कधी आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत बाहेर डिनरसाठी गेल्यानंतर तिने आपल्याला हवं ते मागवून त्यांच्यासोबत पार्टी एन्जॉय करतो. अनेकदा असंही होतं की, कधी आपण कुणाकडे गेल्यानंतर आपल्याला हवं ते खाण्यासाठी काहीसे लाजतो. कुणी समोरून आपल्याला जेवण सर्व्ह केल्यानंतर एक पद्धत असते म्हणून ‘नको, खूप झालं’ असं बोलतो. केवळ एक पद्धत असते म्हणून आपण आणखी वाढण्यासाठी लाजत नकार देत असतो तरी भूक मात्र लागलेली असते. नेमका असाच एक किस्सा या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “तू मोठा होऊन काय बनशील?” या प्रश्नावर मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल, एकदा पाहाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, आधीच ताटभरून जेवण घेऊन हा व्यक्ती त्याच्या मित्रासोबत पार्टी एन्जॉय करत असतो. त्याच्या बाजुला बसलेल्या एका व्यक्तीने त्याला आणखी चिकनचे पीस घेण्यासाठी सांगतो. अशा वेळी एक बोलायची पद्धत असते म्हणनू हा व्यक्ती लाजत हळु आवाजात बोलून नकार देतो. त्यानंतर बाजुला व्यक्ती पुन्हा त्याला चिकनचे पीस घेण्यासाठी आग्रह करतो, पण तरीही तो व्यक्ती लाजत नकारच देतो. आणखी एकदा आग्रह करून मग तो घेईल याच्या प्लॅनिंगमध्ये असतानाच पुढे जे घडलं ते पाहणं फारच मजेदार आहे.

आणखी वाचा : Viral Video : मुलाने गिफ्ट केला स्मार्टफोन, यावर आईचे एक्सप्रेशन्स पाहून तुमचं मन पिघळून जाईल

आपण अनेकदा आग्रह करूनही तो व्यक्ती नकार देत असल्याचं पाहून बाजुच्या व्यक्तीने ती प्लेट दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवली. खरं तर हा व्यक्ती केवळ वरवर दाखवण्यासाठी नकार देत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट दिसून येत आहे. ज्यावेळी बाजुच्या व्यक्तीने चिकन ठेवलेली प्लेट दुसऱ्याकडे सोपवली त्यावेळी या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे सारे रंगच बदलून गेले. समोर आपला आवडता पदार्थ होता तरीही तो आपल्या खाता आला नाही, हे पाहून या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नाराजी झळकत होती. केवळ पद्धत असते म्हणून जेवण सर्व्ह करताना नकार देणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं.

आणखी वाचा : बाबो! पैशांसाठी लहान मुलीने खाल्ली हिरवी मिरची? जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : डान्स करता करता स्टेजवरच भांडू लागल्या मुली, जो सोडवायला आला त्याला सुद्धा धू धू धुतलं!

हा व्हिडीओ ‘memes.bks’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपड आवडू लागला आहे. हा मजेदार प्रसंग पाहून लोक या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात आनंद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉ्र्मवर शेअर करण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी कमेंट्स शेअर करण्यास सुरूवात केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most funny video today delicious food was kept in front of boy see what happened next omg news viral prp