भारतात रेल्वेमार्गाचे जाळे मोठे आहे. जगातील सगळ्यात मोठे रेल्वेमार्गाचे जाळे असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. आजच्या घडीला भारतातील सर्वाधिक जनता ही रेल्वेमार्गाने प्रवास करते. फक्त सपाट जमिनीवरूनच नाही तर काही रेल्वेमार्ग हे समुद्र, नदी अगदी डोंगर फोडून देखील बनवण्यात आले आहेत. त्यामुळे अशा रेल्वेमार्गावरून प्रवास करणे हे रोमांचकारी तर असते पण जोखमीचेही असते. पण जगात असेही काही रेल्वेमार्ग आहेत ज्याने प्रवास करणे म्हणजे जणू मृत्यूच्या दाढेतून प्रवास करण्यासारखेच आहे. ‘वर्थ शेअरिंग व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलने जगातील अशाच काही धोकादायक रेल्वे मार्गाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : वर्षभरापूर्वी मृत पावलेल्या भावाला घेऊन ‘तो’ रात्रभर सायकलवरुन हिंडला

डेथ रेल्वे – थायलंड बुर्मा रेल्वे ही ‘डेथ रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. जी थायलंडच्या बैन पोंग आणि बुर्मा यो दोन स्टेशनला जोडते. ४१५ किलोमीटर लांब हा रेल्वे मार्ग आहे. १ लाख ८० हजार मजूर हा रेल्वे मार्ग बांधण्याच्या कामासाठी जुंपले होते. यात ६० हजार फक्त युद्ध कैदी होते. त्यातले १२ हजार युद्ध कैदी हा रेल्वे मार्ग बांधताना मृत्युमुखी पडले होते. म्हणूच या रेल्वे मार्गाला हे नाव पडलं.

ट्रेन टु द क्लाऊड – नावाप्रमाणे या रेल्वेतून प्रवास करताना जणू आकाशातून प्रवास केल्यासारखा भास होतो. अर्जेंटिनामध्ये हा रेल्वेमार्ग आहे. समुद्रसपाटीपासून १३ हजार ८५० फूट उंचीवर असलेल्या पुलावर हा रेल्वेमार्ग बांधण्यात आला आहे. अँडिजच्या पर्वतरांगेतून ही ट्रेन जाते, सुरूवातीला काही आर्थिक कारणासाठी बांधलेला हा रेल्वेमार्ग नंतर मात्र पर्यटनासाठी खुला करण्यात आला.

डॉलिश रेल्वे ट्रक – समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळून जाणारा हा रेल्वे मार्ग आहे, त्यामुळे कधीकधी वेगात येणाऱ्या लाटेचा तडाखा या मार्गाला बसतो. तर कधी कधी वेगात येणा-या लाटांचे पाणी देखील या मार्गवारून जाणाऱ्या रेल्वेवर उडते. १९२१ आणि २०१४ मध्ये दोनदा येथे अपघात झाला होता.

पामबान पूल – चेन्नई आणि रामेश्वरमला जोडणारा हा रेल्वेमार्ग समुद्रावरून जातो. समुद्रावरून जाणारा हा भारतातील पहिला पूल आहे. २०१४ मध्ये या पुलाला १०० वर्षे पूर्ण झालीत.