Viral Video :- सोशल मीडियावर प्राणी, पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यात अनेक व्हिडीओ असेसुद्धा असतात की, जे प्राणी, पक्षी यांची अनेक कौशल्ये दाखवून अनेकांना थक्क करून सोडतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. तुम्ही पोपटाला माणसांची नक्कल करताना पाहिलं असेल, शिट्टी मारताना ऐकलं असेल; पण तुम्ही कधी पोपटाला सायकल चालवताना, स्केटिंग करताना पाहिलं आहे का? तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एक हुशार पोपट रस्त्यावर आपलं अनोखं कौशल्य दाखवताना दिसला आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक सायकल उभी असते आणि एक लाल रंगाचा पोपट येऊन या सायकलवर बसताना दिसतो. पोपट त्याच्या चोचीने सायकलचे हॅण्डल पकडतो. त्याचे इवलेसे पाय सायकलच्या पँडलवर ठेवतो आणि सायकल चालवायला सुरुवात करतो. त्यानंतर थोडे पुढे आल्यावर पोपट त्याचं वाहन बदलताना दिसतो. तो स्केटिंगवर चढतो आणि त्याचं कौशल्य पुन्हा दाखवताना दिसतो. त्यानंतर पोपट स्केटिंगवरून उतरून कागदाच्या गोल बंडलवर चढतो आणि ते बंडल गोल गोल फिरवून पायांनी सरकवत पुढे घेऊन जातो. पोपटाचं हे कौशल्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. एकदा बघाच पोपटाचं हे अविश्वसनीय कौशल्य.
हेही वाचा… क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यात महिलेची तिघींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; video झाला व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :-
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Enezator) यांच्या अकाउंटवरून शेअर केला गेला आहे; जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण कमेंटमध्ये पोपटाला खेळाडू बोलत आहेत; तर काही जण पोपटाच्या कौशल्याची प्रशंसा करताना दिसून येत आहेत; तर काही जण पोपटाचं कौशल्य पाहून चकित होत आहेत. काळानुरूप अनेक गोष्टींमध्ये बदल होताना दिसत आहे. माणसांची नक्कल करणारे, शिट्या मारणारे हे पोपटसुद्धा काळानुसार नवनवीन गोष्टी शिकताना आणि आपलं कौशल्य दाखवताना दिसत आहेत.