काहीतरी चमचमीत खावेसे वाटले कि आपण आपसूक रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांकडे ओढले जातो. पाणीपुरी, वडापाव, चाट यांसारखे कितीतरी पदार्थ आपण उभ्याउभ्या खात असतो. अनेकदा दुकान ज्या ठिकाणी टाकलेले असते ती जागा फारशी स्वच्छ नसते, परंतु आपल्याला त्या पदार्थांची चव आवडते म्हणून आपण त्याकडे अनेकदा काणाडोळा करतो. मात्र हा व्हिडिओ बघून तुम्ही कुठेही काही खाण्याआधी दहा वेळा नक्कीच विचार कराल.

अनेकदा जिथे पदार्थ बनवले जातात, अशा ठिकाणी स्वच्छतेचा नामोनिशाण नसतो. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओदेखील पाहिले आहेत. कधी कुठली व्यक्ती गटाराच्या पाण्यात भांडी धूत आहे, तर कुणी अगदी हात पाणीपुरीच्या पाण्यात पूर्ण बुडवून काढत असतानाचे कितीतरी व्हिडिओ आपण पाहिलेले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने मात्र आता कळसच केला आहे. @chiragbarjatyaa नावाच्या अकाउंटने आपल्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया हॅण्डलवरून या अस्वछतेचा कळस करणारा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही वाचा : पाटणाची सुप्रसिद्ध ‘धोबीपछाड इमरती’; ‘या’ व्हायरल व्हिडीओमधील स्वच्छता बघून डोक्याला लावाल हात!

व्हिडीओमध्ये आपल्याला एक व्यक्ती एक मळलेला पांढऱ्या रंगाचा गंजी आणि पूर्ण पँट घालून, जमिनीवर मांडी घालून समोर ठेवलेल्या तेलाच्या कळकट कढईत पुऱ्या तळताना दिसत आहे. त्याचा मागे पातेली, परात अशी अजून काही अन्नपदार्थांची भांडी ठेवलेली दिसत आहेत. त्या माणसाच्या बरोबर मागे कणिक मळलेले एक पातेलं आहे. एकंदरीत व्हिडीओमध्ये दिसणारी सर्व खोली, तेलाने कळकट आणि अत्यंत घाणेरडी झालेली आहे असे दिसते. मात्र यावर कळस म्हणजे, त्या खोलीमध्ये किमान ६-७ उंदीर न घाबरता, अगदी बिनधास्त फिरताना दिसत आहेत. त्यामधील एक उंदीर व्यक्ती पुरी तळत असताना; त्याच्या मागे ठेवलेल्या त्या कणकेच्या पातेल्यात जाऊन, पातेल्याला लागलेली कणिक खात असल्याचे आपण पाहू शकतो. मात्र तिथे काम करत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचे काहीही वाटत नाही. असे एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो.

हा व्हिडीओ शेअर करताना चिराग याने, “कृपया लग्न-समारंभात, बाहेरच्या ठिकाणी अन्न कुठे आणि कसे बनत आहे हे तपासून पाहा. हा असा अस्वच्छपणा वाढू देऊ नका. हे भयंकर आहे.” अशा आशयाचे कॅप्शनदेखील लिहिले आहे.

हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्याला आत्तापर्यंत १५९.३K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader