King Cobra Attack Shocking Video Viral : जगातील सर्वात विषारी सापांच्या लिस्टमध्ये किंग कोब्रा अव्वल स्थानावर आहे. कारण या सापाने चावा घेतल्यावर माणसाची वाचण्याची शक्यता खूपच धूसर असते. किंग कोब्रोला पकण्यासाठी अनेक सर्पमित्र जंगलात फिरत असताता. परंतु, हा साप पकडताना काही चूक झाली तर जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्पमित्र या सापाला पकडताना खूप काळजी घेतात. पण आता व्हायरल झालेल्या व्हिडीओत किंग कोब्रा साप सर्पमित्राच्या अंगावर धावला अन् पुढं जे काही घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वांनाच थक्क करणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, किंग कोब्रा जंगलात सरपटत जात असताना सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. साप पकडताना दुसरा एक व्यक्ती हे थरारक दृष्य शूट करत असतो. पण व्हिडीओच्या सुरुवातील तो किंग कोब्रा या तरुणाच्या अंगावर धाऊन जातो आणि फणा मारण्याचा प्रयत्न करतो. पण काही सेकंदातच तो तरुण चालाखीने मागे जातो आणि त्या भयानक सापापासून स्वत:चा जीव वाचवतो. सर्वात विषारी साप पकडताना त्या तरुणाची उडालेली घाबरगुंडी या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Video: ट्रॅफिक झाल्यामुळे पठ्ठ्याने सायरनचा केला गैरवापर, पोलिसांनी रुग्णवाहिका तपासली अन्…

इथे पाहा व्हिडीओ

किंग कोब्राचा हा व्हिडीओ मिलर विल्सन नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून ३६ हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांनी साप पकडण्याचं कौशल्य पाहून त्या तरुणाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याच्यावर टीका करत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने व्हिडीओत प्रतिक्रिया देत म्हटलं, अरे देवा! हा साप खूप थतरनाक आहे. तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, हे खूप भीतीदायक आहे. साप हाताळण्याचं प्रशिक्षण नसल्यास अशा सापांना पकडण्याचा प्रयत्न केल्यास जीव जाऊ शकतो, त्यामुळे कुणीही असा प्रयत्न करू नका, अशा सूचना वनविभागाकडून सर्वांना दिलं जातं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most venomous king cobra tried to bite a man while handling this dangerous reptile watch viral video nss