Viral video: सोशल मीडियावर रोज किती तरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना मोठ्या आवडीने शेअरही केले जाते. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच हौशी माय-लेकींचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या माय-लेकींनी भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक म्हणजे आई आणि मुलीचे नाते. आई आपल्या मुलींना तिच्या आयुष्यात मिळालेल्या सर्व गोष्टी शिकवते. मुलींना सशक्त बनवण्यासाठी आईचे संगोपनही खूप महत्त्वाचे असते. मुलींसाठी घरात आई सावलीसारखी असते, जी तिला घरात स्थिरावण्यापासून बाहेरच्याही अत्यंत कठीण प्रसंगात धीर देते. मुलींसाठी आई एखाद्या डोंगरासारखी असते, जी प्रत्येक परिस्थितीत तिच्या पाठीशी उभी असते.
सध्या अशाच एका माय-लेकींचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहताच त्यातली नक्की आई कोण आणि लेक कोण हे न समजल्याने लोक गोंधळात पडले आहेत. या व्हिडीओमध्ये मायलेकी सुंदर डान्स करताना दिसत आहे. “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्या अप्रतिम डान्स करताना दिसतात. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
“आयुष्य खूप सुंदर आहे फक्त माय-लेकी अशा पाहिजेत”
mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आयुष्य सगळ झापुक झुपुक होऊन जातं” तर व्हिडीओवर लिहलंय, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त माय-लेकी अशा पाहिजेत.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “परफेक्ट जमलं”