Mother And Son Emotional Video : असं म्हणतात ना संघर्ष कुणालाच चुकलेला नाही, प्रत्येकाला आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हाच संघर्ष माणसाला जगायला शिकवतो, तुम्हाला अजून मजबूत बनवतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात चिमुकल्याची मेहनत पाहून तुम्हीही भावूक व्हाल. ज्या वयात लहान मुलं खेळतात, बागडतात त्या वयात हा चिमुकला आपल्या आईच्या कष्टात ज्याप्रकारे मदत करतोय हे पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. यातून माणसाने कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही परिस्थिती शिकवते याची प्रचिती येते. हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मजुरी करणारी आई मुलाला भांड्यात खडी भरून मिक्सरमध्ये ओतण्यासाठी घेऊन जाताना दिसतेय, आईला मदत करण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हल्ली पदवीधर किंवा त्याहून उच्च शिक्षण झालेली मुलं चांगली नोकरी मिळत नाही असे म्हणून अनेक वर्ष आई-वडिलांच्या जीवावर मज्जा मस्ती करतात. पण, गरीब किंवा हातावर पोट असलेल्या मुलांना कष्टावाचून पर्याय नसतो, कारण दिवसभर कमावले तर रात्री पोटभर खाऊ शकतात अशी परिस्थिती असते. त्यामुळे तुम्ही अनेक बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या इथे पहाल तर आई-वडिलांसह त्यांची हाताला आलेली मुलंही मोलमजुरी करताना दिसतात. त्यांनाही वाटतं शिकावं, मोठं व्हावं, परंतु परिस्थितीपुढे त्यांचं काहीच चालत नाही. पण, या परिस्थितीची जाणीव व्हिडीओतील चिमुकल्याला अगदी लहान वयातच झाल्याचे दिसत आहे.

कारण व्हिडीओत ते लहान मूल अगदी आपले आई-वडील खडी उचलून टाकत आहेत, त्याचप्रकारे तो भांड्यातून खडी उचलून आणतोय. व्हिडीओत पाहू शकता, एक चिमुकल्या आपल्या आईसह एका लहान भांड्यातून खडी भरून रेती, खडी, सिमेंट मिक्स करायच्या मिस्करमध्ये आणून टाकतोय. आईने तिच्या डोक्यावरील खडीने भरलेलं घमेलं रिकामं केल्यानंतर ती चिमुकल्याच्या डोक्यावरील भांडं त्या मिक्सरमध्ये रिकामे करून देते. आईच्या डोक्यावरील ओझं हलकं करण्यासाठी चिमुकल्याची सुरू असलेली धडपड अगदी काळजाला भिडतेय.

काळजाला भिडणारा व्हिडीओ

टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी रतन टाटांना वाहिली अनोखी श्रद्धांजली! श्वानाची ‘ती’ कृती पाहून उपस्थितही झाले भावूक; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

हा भावनिक व्हिडीओ mpsc_short_notes’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कोवळ्या वयात चिमुकल्याची आईला मदत करण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून दु:ख व्यक्त केले. एकाने लिहिलेय की, गरिबीमध्ये खूप दुःख आहे… दुसऱ्या युजरने लिहिलेय की, खेळण्या बागडण्याच्या वयात निष्पाप जीव अशी कामं करताना बघितल्यावर खूप वाईट वाटलं. तिसऱ्या एकाने लिहिलेय की, माझ्या बांधकामांवरपण असंच एक लेकरु खेळत असतं, मी त्याला रोज खाऊ देतो. पण, त्यांचं भवितव्य काय असेल हे विचार करूनच वाईट वाटतं, कुठे पण खेळतात,आई -वडील कामात असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायलापण कोणी नसते. चौथ्या एकाने लिहिले की, परिस्थितीच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत कधीच नापास होत नाही.