Son and mother over property: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हटलं जातं, कारण आईची पोकळी आयुष्यात कोणीच भरून काढू शकत नाही. आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करते, माया करते; त्यांना ती स्वत:पेक्षा जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी दिवस-रात्र झटणारी आई खूप कमी मुलांना कळते. आईने केलेले कष्ट ज्या लेकराला कळतात तोच आईचा आदर करतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वय झालं की जी मुलं आईचा आधार बनतात, तिचा सांभाळ करतात त्यांनाच तिचं महत्त्व कळतं. प्रॉपर्टीसाठी भांडणारी, आईचं वय झालं की वृद्धाश्रमात टाकणारी भावंडं आपण सगळीकडेच पाहतो. पण, सगळी मालमत्ता पणाला लावून फक्त आईला सांभाळणारा लेक आपल्याला खूप क्वचित दिसतो. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात आईला सांभाळण्यासाठी मुलाने सगळी मालमत्ता त्याच्या भावंडांना दिली.
हेही वाचा… सिगारेट घेतली अन्…, एका रीलसाठी तिघींनी ओलांडली मर्यादा! VIDEO पाहून बसेल धक्का
आईसाठी सोडली मालमत्ता
आई आणि लेकाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. या व्हिडीओत प्रॉपर्टीचं वाटप करायला जाणारा मुलगा आईला म्हणतो, “मॉं हमारा बटवारा हो गया भाईयों का, मैं सारे जायदाद के कागज और ये पैसा सब भाईयों को देकर आ रहा हूँ, लेकिन मैं तुम्हें नहीं दूंगा, ये फैसला हुआ है सारी जायदाद और सब पैसा मैं उन्हें दूंगा, पर मैं तुम्हें नहीं दूंगा, अब मैं तुम्हें पूछना चाहता हूँ, तुम किसके साथ रहोगी भाईयों के या मेरे साथ.” (आई आमच्या भावंडांचं वाटप झालंय, मी सर्व मालमत्तेची कागदपत्रे आणि हे पैसे सर्व भावांना देत आहे, परंतु मी तुला देणार नाही. मी सर्व मालमत्ता आणि पैसे त्यांना देईन, पण तुला नाही देणार असे ठरले आहे. आता मला तुला विचारायचे आहे, तू भावांकडे राहणार की माझ्याकडे राहणार?) यावर आई म्हणते, “तुम्हारे साथ.” (तुझ्याबरोबर)
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “चलती फिरती हुई आँखों से अज़ाँ देखी है मैंने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल ३.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
मुलाच्या या कृतीने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “भावा तू आज जग जिंकलास”, अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने “सोन्याचं हृदय असलेला माणूस” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “भाऊ फक्त रीलसाठी नाही तर खऱ्या आयुष्यातही असाच राहा.” “आई- वडीलच सगळं काही असतात”, अशी कमेंट एकाने केली.